इंग्लडमध्ये सुरू असलेल्या WorldCup2019 मध्ये आज भारत आणि श्रीलंका सामना रंगत आहे. श्रीलंका संघ प्रथम फलंदाजी करत असून भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने नवा विक्रम केला. या सामन्यात कर्णधार आणि सलामीवीर दिमुथ करुणरत्नेला झेलबाद करत 57 एकदिवसीय डावामध्ये 100 बळी टिपत भारताकडून सर्वात जलद 100 गडी टिपणारा दुसरा गोलंदाज ठरला.
WorldCupचा आज भारत आणि श्रीलंका सामना हेडिंग्ले लीड्स मैदानावर रंगत आहे.
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
या सामन्यात भारताच्या वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने आपले नावे नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार आणि सलामीवीर दिमुथ करुणरत्नेला झेलबाद करत पहिला धक्का दिला.
करुणरत्नेचा बळी टिपताच बुमराहने आपल्या कारकिरीदीर्तील एक महत्वाचा टप्पा पार करत नवा विक्रम केला आहे.
Jasprit Bumrah strikes! Nine dots in a row from him, and the pressure tells as #DimuthKarunaratne gets a toe-end through to MS Dhoni. Sri Lanka are 17/1#CWC19 | #SLvIND pic.twitter.com/2mNseluhOO — Cricket World Cup (@cricketworldcup) July 6, 2019
बुमराह भारताकडून सर्वात जलद 57 एकदिवसीय डावामध्ये 100 बळी टिपणारा दुसरा गोलंदाज ठरला.
तर मोहम्मद शमी हा भारताकडून सर्वात जलद 100 बळी टिपणारा अव्वल गोलंदाज आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.