Japan Earthquake Update : जपानमध्ये 7.6 तीव्रतेचा भूकंप, त्सुनामीच्या लहान लाटाही

8 डिसेंबर रोजी जपान उत्तरेकडील भूमि हादरली आहे. जपानच्या उत्तरेकडील किनाऱ्यावर 8 डिसेंबर रोजी स्थानिक वेळेनुसार रात्री 11:15 च्या सुमारास 7.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला.
Japan Earthquake Update : जपानमध्ये 7.6 तीव्रतेचा भूकंप, त्सुनामीच्या लहान लाटाही

8 डिसेंबर रोजी जपान उत्तरेकडील भूमि हादरली आहे. जपानच्या उत्तरेकडील किनाऱ्यावर 8 डिसेंबर रोजी स्थानिक वेळेनुसार रात्री 11:15 च्या सुमारास 7.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपामुळे उत्तर जपानमधील जनजीवन पुर्णपणे हादरले असून सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भूकंपाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

हेही वाचा- UPI Payment System: भारतीय UPI पेमेंट सिस्टम जगातील सर्वात मोठा रिअल-टाइम पेमेंट प्लॅटफॉर्म

ज्यात या भूकंपाच्या तीव्रतेने शहरांमधील अनेक इमारती आणि पूल डगमगताना दिसले आहेत तसेच मोठी जीवित आणि वित्तहानी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या भूकंपानंतर समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणात उलथापालथ झाली आहे. त्यामुळे उराकावा शहर आणि मुत्सु ओगावारा पोर्ट येथील रहिवाशांना तात्काळ समुद्र किनारा आणि सखल भाग सोडून सुरक्षित उंच ठिकाणी जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हेही वाचा- Nagpur Crime News: नागपूर हादरले! नोकरीचे आमिष दाखवत लग्न केले; फसवणूक आणि मानसिक छळामुळे कबड्डीपटूने घेतला थेट टोकाचा निर्णय

तसेच हाचिनोहे शहर या दाट लोकवस्तीच्या शहरातही मोठ्या प्रमाणात स्थलांतर सुरू झाले आहे.  जपान हवामान एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार किनारपट्टी भागासाठी 10 फुटांपर्यंत उंच त्सुनामी लाटांचा इशारा यापुर्वीच देण्यात आला होता. आओमोरी आणि होक्काइडो असून अंदाजे 50 किलोमीटर खोलवर समुद्रात या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. या भूकंपामुळे परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. तसेच नागरिकांना शांतता राखण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version