IPL 2026 Auction Highlights: पृथ्वी शॉ-सर्फराज खानला एकसारखी बोली, कोणत्या संघांनी विकत घेतलं?

आयपीएल लिलावात पहिल्या फेरीत दुर्लक्षित राहिल्यानंतर पृथ्वी शॉ आणि सर्फराझ खान यांना दुसऱ्या फेरीत संधी मिळाली.
IPL 2026 Auction Highlights: पृथ्वी शॉ-सर्फराज खानला एकसारखी बोली, कोणत्या संघांनी विकत घेतलं?

अबूधाबी: आयपीएलचा लिलाव नेहमीच अनिश्चिततेने भरलेला असतो. कधी एखाद्या खेळाडूवर कोट्यवधींची बोली लागते, तर कधी उत्तम कामगिरी असूनही खेळाडू बराच वेळ वाट पाहत बसतो. यंदाच्या लिलावातही असाच थरार पाहायला मिळाला आणि पृथ्वी शॉ व सर्फराझ खान यांच्या बाबतीत नशिबाने अखेर साथ दिली.

लिलावापूर्वी या दोन्ही खेळाडूंच्या नावांची जोरदार चर्चा होती. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण आणि दमदार कामगिरी केल्यामुळे आयपीएलमध्ये कोणता संघ त्यांना संधी देतो, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. मात्र पहिल्या फेरीत पृथ्वी शॉचे नाव पुकारले गेले तेव्हा काही काळ शांतता पसरली. आश्चर्याची बाब म्हणजे सर्फराझ खानलाही पहिल्या फेरीत कोणीच बोली लावली नाही.

हेही वाचा: IPL 2026 Auction: मॉडेलसारखा लूक आणि दमदार फिटनेस! IPL लिलावाआधी पप्पू यादव यांचा मुलगा सार्थक रंजन चर्चेत

लिलावाची दुसरी फेरी सुरू होताच मात्र चित्र बदलले. पहिल्या फेरीत दुर्लक्षित राहिलेले खेळाडू पुन्हा चर्चेत आले आणि इथेच पृथ्वी व सर्फराझ यांचे नशीब फळफळले. पृथ्वी शॉला पुन्हा एकदा दिल्ली कॅपिटल्सने संघात स्थान दिले. याआधीही तो दिल्लीच्या संघाचा भाग राहिला असून, पुन्हा जुन्याच संघात परतल्याने चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. दुसरीकडे, स्थानिक स्पर्धांमध्ये धावांचा पाऊस पाडणाऱ्या सर्फराझ खानलाही अखेर न्याय मिळाला. दुसऱ्या फेरीत चेन्नई सुपर किंग्सने त्याला आपल्या संघात सामील करून घेतले.

अनुभवी नेतृत्वाखाली खेळण्याची संधी मिळाल्याने सर्फराझसाठी हा आयपीएल हंगाम खास ठरू शकतो. विशेष म्हणजे या दोन्ही खेळाडूंना लिलावात एकसारखीच किंमत मिळाली. पृथ्वी शॉ आणि सर्फराझ खान यांची मूळ किंमत 75 लाख रुपये होती आणि त्याच किंमतीत दिल्ली कॅपिटल्स व चेन्नई सुपर किंग्स यांनी अनुक्रमे त्यांना संघात सामावून घेतले.

पहिल्या फेरीतील शांततेनंतर दुसऱ्या फेरीत मिळालेली संधी आणि नव्या आशेचा किरण या आयपीएल लिलावाने पुन्हा एकदा सिद्ध केले की क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू पडेपर्यंत काहीच ठरलेले नसते. आता मैदानावर या दोघांकडून चाहत्यांना दमदार खेळीचीच अपेक्षा असेल.

हेही वाचा: Narendra Modi : पंतप्रधान मोदींची जागतिक मोहोर! इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version