IPL 2026 MI vs KKR : 14 वर्षांचा ‘तो’ इतिहास बदलण्यासाठी MI सज्ज; घरच्या मैदानावर केकेआरची धुलाई करणार?

आयपीएलच्या 19व्या हंगामातील दुसरा सामना 5 वेळा आयपीएल ट्रॉफी नावे करणाऱ्या मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. मुंबई इंडियन्सचा 14 वर्षांचा वनवास संपणार?
IPL 2026 MI vs KKR : 14 वर्षांचा ‘तो’ इतिहास बदलण्यासाठी MI सज्ज; घरच्या मैदानावर केकेआरची धुलाई करणार?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्या सामन्याने आयपीएल 2026 19 व्या हंगामाला सुरुवात झाली आहे. या सामन्यात आरसीबीने घरच्या मैदानावर इज्जत राखून ठेवली. यानंतर आज आयपीएलच्या 19व्या हंगामातील दुसरा सामना 5 वेळा आयपीएल ट्रॉफी नावे करणाऱ्या मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. हा सामना मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर पार पडणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणारा आजचा सामना रोमांचक तसेच चुरसीचा पाहायला मिळणार आहे. यादरम्यान मुंबई इंडियन्स गेली 14 वर्षांपासून नको असलेला रेकॉर्ड मोडीस काढतात का ते पाहण महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच केकेआरसाठी वानखेडे स्टेडियम खेळपट्टी मानवणारी ठरणार का? हे देखील तितकचं महत्त्वाचं ठरणार आहे. 

हेही वाचा- RCB vs SRH: कोहली-पडीक्कलच्या जबरदस्त खेळीने उडवला हैदराबादचा धुव्वा; 200 पेक्षा जास्त धावांचा पाठलाग करत मिळवला दणदणीत विजय
मुंबई इंडियन्सचा 14 वर्षांचा वनवास संपणार
मुंबई इंडियन्स हा आयपीएलमधील स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ मानला जातो. आतापर्यंत पाच वेळा या संघाने विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. मात्र मुंबई इंडियन्स हा संघ एक गोष्ट गेली 14 वर्षे बदलू शकले नाही. जेव्हा जेव्हा आयपीएलमधील पहिल्या सामन्याची वेळ आली तेव्हा तेव्हा मुंबई इंडियन्स हा संघ अपयशी ठरला आहे. यासंदर्भात सोशल मीडियावर देखील अनेक नेटकऱ्यांकडून विनोद व्हायरल करताना पाहायला मिळाले आहेत. मुंबई इंडियन्सने शेवटचा आपला पहिला आयपीएल सामना 2012 मध्ये जिंकला होता. त्यानंतर अजून एकदा देखील मुंबई इंडियन्स आपला पहिला सामना जिंकले नाही. दरम्यान केकेआर सोबतच्या आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्स हा रेकॉर्ड मोडून पहिला सामना जिंकणार का? हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे. 

हेही वाचा- IPL 2026 RCB vs SRH : भुवनेश्वर कुमारच्या ओव्हरमध्ये कोहलीची 'ती' चूक अन् संपूर्ण स्टेडियम झाला हक्काबक्का
वानखेडे स्टेडियम खेळपट्टीचा अहवाल 
आतापर्यंत वानखेडेवर मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळलेल्या 12 सामन्यांपैकी केकेआरने फक्त दोनच सामने जिंकले आहेत. वानखेडेवर केकेआरची मुंबई इंडियन्सविरुद्ध कामगिरी खराब असल्याचे पाहायला मिळाले आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीवर गोलंदाजांची नेहमीच धुलाई होते. येथे कोणत्याही धावसंख्येचा पाठलाग करता येतो. दोन्ही संघांमध्ये अनेक स्फोटक फलंदाज असल्याने, सामना मोठ्या धावसंख्येचा होण्याची शक्यता आहे. दरम्यान यावेळी मुंबई इंडियन्सकडून कर्णधार हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह आणि रोहित शर्मा यांच्यावर सर्वांच्या नजरा असतील. केकेआरकडून फिन ऍलन, टिम सेफर्ट, कॅमेरॉन ग्रीन आणि अजिंक्य रहाणे हे प्रमुख खेळाडू असतील. हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे, तर रहाणे केकेआरचे नेतृत्व करेल. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version