आयपीएल 2026 स्पर्धेतील कालचा सामना अतिशय थरारकरित्या पार पडला. कोलकाताच्या घराच्या मैदानात लखनौ सुपर जायंट्सने शाहरूख खानच्या कोलकाता नाइट रायडर्स संघाला धुळ चारली आहे. 9 एप्रिल रोजी कोलकाता येथील इडन गार्डन्स मैदानात पार पडलेल्या या सामन्यात नाणेफेकीचा निकाल लखनौच्या बाजूने झाला. यावेळी त्यांनी प्रथम गोलंदाजी घेत कोलकाताला फलंदाजीसाठी सज्ज केले. प्रथम फलंदाजी करताना केकेआरने 181 धावा केल्या यावेळी त्यांचे 4 गडी बाद झाले होते. केकेआरच्या या आव्हानाला उत्तर देत लखनौने 182 धावा करत हातून निसटलेला सामना खेचून आणला. यावेळी लखनौसाठी विजयाचा खरा कारण ठरला मुकुल चौधरी… एकीकडे लखनौचे एका मागोमाग एक गडी बाद होत असताना मुकुलने अर्धशतकी खेळीच्या जोरावर हा सामना जिंकवला. यावेळी लखनौ सुपर जायंट्सचा या स्पर्धेतील दुसरा विजय आहे. तर कोलकाता सलग तिसऱ्यांदा अयशस्वी ठरले आहे.
यावेळी प्रथम फलंदाजी करताना कोलकाताकडून अजिंक्य रहाणे आणि फिन एलन जोडी सलामीवीरासाठी उतरली. यावेळी फिन एलन अवघ्या 9 धावांवर बाद झाला तर अजिंक्य रहाणे 41 धावा करून बाद झाला. त्यानंतर लगेचच अंगकृष रघुवंशीची विकेट 45 धावांवर पडली. सलग 4 विकेट पडल्यानंतर कॅमरून ग्रीन आणि रोवमॅन पॉवेल यांनी 40 चेंडूत 70 धावांची भागीदारी केली आणि लखनौसमोर 181 धावांचा डोंगर उभा केला.
लखनौने सुरूवातीलाच मिचेल मार्श आणि एडन मार्करम या जोडीच्या मदतीने 37 धावांची खेळी करता आली. यावेळी एडन मार्करमने 22 धावा केल्या तर मिचेल मार्श 15 धावा करत बाद झाला. यानंतर ऋषभ पंत 10, आयुष बदोनी 54, निकोलस पूरन 13, अब्दुल समद 2, मोहम्मद शमी 1 करून बाद झाले. कोलकाताच्या गोलंदाजांची समोर लखनौचा ठावठिकाणा लागेल का? असा प्रश्न उपस्थित झाला. मोहम्मद शमीची विकेट गेल्यानंतर 24 चेंडूत 54 धावांची गरज होती आणि समोर आवेश खान असताना मुकुल चौधरीने त्याला स्ट्राईक दिली नाही.
अनकॅप्ड मुकुल चौधरी मैदानात असताना अनेकांना वाटल आता हा लखनौच्या हातातून हा सामना जाणार, मात्र त्याने हा अंदाज मोडून काढला आणि 27 चेंडूत 7 षटकार आणि 2 चौकार मारत नाबाद 54 धावा केल्या. यावेळी 24 पैकी 21 चेंडू एकटा मुकूल चौधरी खेळला आणि 52 धावा केल्या. लखनौच्या विजयानंतर गोयंका मुकुलला भेटायला मैदानात आले आणि त्यांनी मुकुलच्या चेहऱ्यावर हात फिरवला. गोयंका यांचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.