IPL Auction: BCCI ची घोषणा; IPL 2026 लिलावात 350 खेळाडू; ‘Accelerated’ फेरीत होणार मोठी चुरस

BCCI ने IPL 2026 लिलावासाठी 350 खेळाडूंची अंतिम यादी जाहीर केली असून अबू धाबी येथे 16 डिसेंबरला लिलाव होणार आहे.
IPL Auction: BCCI ची घोषणा; IPL 2026 लिलावात 350 खेळाडू; ‘Accelerated’ फेरीत होणार मोठी चुरस

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (Board of Control for Cricket in India, BCCI) इंडियन प्रीमियर लीग (Iindian Premiere League) 2026च्या लिलावासाठी 350 खेळाडूंची अंतिम यादी जाहीर केली आहे. येत्या 16 डिसेंबर रोजी अबू धाबीतील एतिहाद अरेना येथे होणाऱ्या या लिलावात दुपारी एक वाजता (भारतीय वेळेनुसार 2.30 वाजता) बोली प्रक्रिया सुरू होणार आहे. सुरुवातीला 1,355 खेळाडूंची तयार केलेली यादी फ्रँचायजीसोबत झालेल्या चर्चेनंतर कमी करून 350 वर आणण्यात आली. अंतिम यादीमध्ये 35 नव्या नावांचा समावेश करण्यात आला असून, त्यात दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी यष्टिरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉक याचे नाव विशेष ठरले आहे.

मूळ यादीत नसलेला डी कॉक एका फ्रँचायजीच्या शिफारसीनंतर समाविष्ट झाला. अलीकडेच त्याने आंतरराष्ट्रीय निवृत्तीचा निर्णय मागे घेत भारताविरुद्ध विशाखापट्टणम येथे खेळलेल्या वनडेत शतक झळकावले होते. मागील मेगा लिलावात दोन कोटींना विकला गेलेला डी कॉक यावेळी एक कोटी बेस प्राईजवर उपलब्ध राहणार आहे. तिसऱ्या लॉटमध्ये ठेवण्यात आलेल्या डी कॉकसोबत काही श्रीलंकन खेळाडूंनाही जागा मिळाली आहे. त्यात ट्रावीन मॅथ्यू, बिनुरा फर्नांडो, कुशल परेरा आणि दुनीथ वेल्लालगे यांचा समावेश आहे.

हेही वाचा: Donald Trump: अमेरिकेचा भारतावर नवा टॅरिफ प्रहार? ट्रम्प प्रशासन मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

याशिवाय अफगाणिस्तान, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीजमधील काही उदयोन्मुख खेळाडूंनाही अंतिम क्षणी लिलाव यादीत स्थान मिळाले आहे. लिलावाची सुरुवात कॅप्ड खेळाडूंच्या विभागणीपासून होणार असून फलंदाज, अष्टपैलू, यष्टिरक्षक-फलंदाज, जलदगती गोलंदाज आणि फिरकी गोलंदाज अशा श्रेणींमध्ये पहिल्या क्रमाकांची मांडणी करण्यात आली आहे. पहिल्या लॉटमध्ये (BA1) कॅमेरॉन ग्रीन आघाडीवर असून देवॉन कॉन्वे, जेक फ्रेझर-मॅकगर्क, सरफराज खान, पृथ्वी शॉ आणि डेविड मिलर यांचा समावेश आहे. तर अष्टपैलूंच्या दुसऱ्या लॉटमध्ये (AL1) वेंकटेश अय्यरचा समावेश करण्यात आला आहे.

नियोजित कार्यक्रमानुसार, 70व्या खेळाडूनंतर म्हणजेच अफगाणिस्तानच्या वहिदुल्लाह जद्राननंतर लिलावाचा ‘Accelerated’ टप्पा सुरू होईल. यामध्ये 71 ते 350 क्रमांकांपर्यंतचे खेळाडू सादर केले जातील. त्यानंतर फ्रँचायझींना न सादर झालेले आणि न विकले गेलेले खेळाडू पुन्हा ‘Accelerated’ फेरीत आणण्यासाठी आपली प्राधान्य यादी देण्यास सांगितले जाईल.

अंतिम यादी फ्रँचायझींनी मागणी केलेल्या नावांवर आधारित असल्याचे BCCI ने स्पष्ट केले असून देशांतर्गत क्रिकेटमधील अनेक नवोदित भारतीय खेळाडूंनाही या यादीत स्थान मिळाले आहे. त्यात सदेक हुसैन, विष्णू सोलंकी, सबीर खान, परिक्षित वाळसंगकर, नमन् पुष्पक, पुरव अग्रवाल, रोशन वाघसरे, यश दीचोलकर आणि इतर अनेक तरुण खेळाडूंच्या नावांचा समावेश आहे. या सर्व खेळाडूंना IPL लिलावातून व्यासपीठ मिळण्याची संधी निर्माण झाली आहे.

हेही वाचा: Supreme Court Decision: शतकांपासूनची प्रथा मोडीत काढत सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली मातृजातीनुसार जात प्रमाणपत्राची मागणी

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version