भारताची बॅडमिंटनमध्ये चमकदार कामगिरी

भारताची बॅडमिंटनमध्ये चमकदार कामगिरी

भारतीय किशोरवयीन खेळाडू गायत्री गोपीचंद आणि ट्रीसा जॉली यांनी बर्मिंगहॅम येथे प्रतिष्ठित ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. १९ वर्षीय गायत्री आणि १८ वर्षीय ट्रीसा यांनी पहिला सामना गमावल्यानंतर पुन्हा झुंज दिली आणि दोन मॅच पॉइंट्स वाचवले.

कोरियाच्या ली सोही आणि शिन सेंगचॅन या द्वितीय मानांकित जोडीचा १४-२१, २२-२०, २१-१५ असा पराभव केला. सुरुवातीला गायत्री आणि जॉली या पिछाडीवर होत्या. या जोडीला हरवताना गायत्री आणि जॉली या अननुभवी मुलींनी दुसऱ्या आणि तिसऱ्या खेळीमध्ये मोक्याच्या क्षणी पुनरागमन केले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version