Pratika Rawal : "जर कोणतीही थर्ड पार्टी माझ्या…" वर्ल्डकप गाजवणाऱ्या स्टार खेळाडूला राग अनावर! पोस्ट करत व्यक्त केली नाराजी

वर्ल्डकप गाजवणारी भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू प्रतिका रावल सोशल मीडियावरील एका मुद्द्यावरून चर्चेचा विषय ठरली आहे.
Pratika Rawal : "जर कोणतीही थर्ड पार्टी माझ्या…" वर्ल्डकप गाजवणाऱ्या स्टार खेळाडूला राग अनावर! पोस्ट करत व्यक्त केली नाराजी

टीम इंडियातील खेळाडू हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील सुरु असलेल्या गोष्टींमुळे चर्चेत येत असतात. असं असताना वर्ल्डकप गाजवणारी भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू प्रतिका रावल सोशल मीडियावरील एका मुद्द्यावरून चर्चेचा विषय ठरली आहे. यावेळी तिने संताप देखील व्यक्त केला आहे. वर्ल्ड कप 2025 मध्ये विजय मिळवल्यानंतर प्रतिका रावल आणि टीम इंडियातील इतर खेळाडू तुफान फेमस झाली. तिचा चाहतावर्ग देखील मोठ्याप्रमाणात वाढू लागला. मात्र यामुळे तिला प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले. वर्ल्ड कप 2025 नंतर सोशल मीडियावर तिचे एडिट व मॉडिफाय केलेले फोटो व्हायरल होऊ लागले.

हेही वाचा- Vaibhav Suryavanshi Record: पंतचा रेकॉर्ड आता इतिहास! भारताला मिळाला नवा ‘सिक्सर किंग’; वैभव सूर्यवंशीने 15 चेंडूत केला ‘हा’ पराक्रम

ज्यामुळे ती ट्रोलिंगच्या कचाट्यात सापडली, ज्याचा तिला मनस्ताप होऊ लागला. यालाच कंटाळून तिने प्रतिकाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले की, “अरे @ग्रोक, मी तुम्हाला माझा कोणताही फोटो काढण्याचा, त्यात सुधारणा करण्याचा किंवा संपादित करण्याचा अधिकार देत नाही, मग तो भूतकाळात प्रकाशित झालेला असो किंवा मी पोस्ट केलेला भविष्यातला असो. जर एखाद्या तृतीय पक्षाने तुम्हाला माझ्या कोणत्याही प्रकारच्या फोटोमध्ये कोणतेही संपादन करण्यास सांगितले तर कृपया ती विनंती नाकारा. धन्यवाद”

हेही वाचा- T20 World Cup 2026: वर्ल्ड कप सुरू होण्यापूर्वीच मोठा राडा; बांग्लादेश संघ भारतात येणार नाही? वाचा काय आहे बीसीबीचा ‘प्लॅन बी’
तिच्या परवानगीशिवाय तिच्या फोटोमध्ये एडिटिंग करून बदल केल्यामुळे प्रतिका नाराज झाली. यावर तिने उघडपणे आपली भूमिका मांडत सोशल मीडियावर घडत असलेला प्रकार सांगितला. दरम्यान 2025 मध्ये पार पडलेल्या वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाच्या विजयात तिचा देखील खारीचा वाटा होता. तिने सात सामन्यांत 308 धावांची जबरदस्त कामगिरी करत भारताकडून दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली. प्रतिका रावलने आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात सीनियर देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्लीकडून केली. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version