IND vs PAK Hong Kong Sixes: हाँगकाँग सिक्सेस 2025 स्पर्धेत भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला पराभूत करत दमदार कामगिरी कायम ठेवली आहे. ग्रुप ‘C’ मधील हा सामना मोंग कोक येथील मिशन रोड मैदानावर खेळवण्यात आला. पावसाने व्यत्यय आणलेल्या या रोमांचक सामन्यात भारताने डीएलएस पद्धतीने पाकिस्तानवर 2 धावांनी विजय मिळवला.
पावसाने बिघडवला सामना, पण भारताचा विजय कायम
नाणेफेक जिंकून पाकिस्तानच्या कर्णधार अब्बास आफ्रिदीने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने 6 षटकांत 4 बाद 86 धावा केल्या. रॉबिन उथप्पा (28 धावा) आणि भरत चिपली (24 धावा) यांनी जलद सुरुवात करून संघाचा पाया रचला. पाकिस्तानकडून मोहम्मद शहजादने 2 बळी घेतले, तर भारताकडून स्टुअर्ट बिन्नीने 1 विकेट घेत पहिला झटका दिला.
हेही वाचा – Bangladesh Cricket : 'माझ्या जवळ आला आणि…'; बांगलादेशच्या माजी महिला कर्णधाराचा निवडकर्त्यावर आरोप
पाकिस्तानने प्रत्युत्तरात जलद सुरुवात केली होती. पाऊस सुरू झाला तेव्हा त्यांचा स्कोर होता 41 धावा, 3 षटकांत 1 बाद असा होता. त्यानंतर सामना थांबवण्यात आला आणि DLS पद्धतीनुसार भारत 2 धावांनी विजयी ठरला.
हेही वाचा – Pratika Rawal: जय शाह यांचा हस्तक्षेप निर्णायक; प्रतीका रावलला मिळालं तिचं हक्काचं विश्वचषक मेडल
भारताचा डाव
भारताकडून रॉबिन उथप्पा, भरत चिपली आणि कर्णधार दिनेश कार्तिक (17 धावा, 6 चेंडू) यांनी आक्रमक फलंदाजी केली. उथप्पा आणि चिपलीने केवळ 2.3 षटकांत 42 धावांची भागीदारी केली. मोहम्मद शहजादने मात्र भारताच्या डावाला ब्रेक लावला, त्याने उथप्पा आणि बिन्नीला लवकर बाद केले. टीम इंडिया आता 8 नोव्हेंबर रोजी कुवेतविरुद्ध त्यांचा पुढचा ग्रुप सामना खेळणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.