T20 World Cup 2026 : टी 20 विश्वचषकात भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने; ‘या’ दिवशी होणार लढत

श्रीलंकेतील दोन प्रमुख स्टेडियममध्ये विश्वचषकातील सामने खेळवले जाणार आहेत. भारत–पाक सामना कोणत्या मैदानावर होणार याची माहिती अजून नाही, मात्र हा सामना श्रीलंकेतच होणार हे निश्चित मानले जात आहे.<br/>
T20 World Cup 2026 : टी 20 विश्वचषकात भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने; ‘या’ दिवशी होणार लढत

T20 World Cup 2026: पुढील वर्षी म्हणजेच 2026 च्या टी20 विश्वचषकासाठी आता फक्त अडीच महिने उरले असले तरी आयसीसीकडून अधिकृत वेळापत्रक जाहीर झालेले नाही. भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली 7 फेब्रुवारी ते 8 मार्च 2026 दरम्यान हा मेगा टूर्नामेंट पार पडणार आहे. सहभागी असलेल्या 20 संघांच्या सामन्यांची तारीख, वेळ आणि स्थळांची अधिकृत माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, स्पर्धेच्या संभाव्य वेळापत्रकाबद्दल काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. RevSportzच्या अहवालानुसार, टीम इंडिया या विश्वचषकातील पहिला सामना यूएसएविरुद्ध खेळेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच सर्वाधिक चर्चेत असलेला भारत-पाक सामना 15 फेब्रुवारी रोजी कोलंबोमध्ये आयोजित होऊ शकतो.

कोलंबो बनणार भारत-पाक सामन्याचे युद्धभूमी?

श्रीलंकेतील दोन प्रमुख स्टेडियममध्ये विश्वचषकातील सामने खेळवले जाणार आहेत. भारत–पाक सामना कोणत्या मैदानावर होणार याची माहिती अजून नाही, मात्र हा सामना श्रीलंकेतच होणार हे निश्चित मानले जात आहे.

हेही वाचा – ENG vs AUS Test Match: मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीची कमाल; 14 वर्षांचे हे सर्व रेकॉर्ड्स काढले मोडीत, नेमकं काय घडलं?

भारत, पाकिस्तान, अमेरिका पुन्हा एकाच गटात?

मागील टी20 विश्वचषकाप्रमाणेच यंदाही 20 संघांना चार गटांमध्ये विभागले जाणार आहे. लीक झालेल्या तात्पुरत्या वेळापत्रकानुसार, भारत, पाकिस्तान आणि यूएसए पुन्हा एका गटात असतील. 2024 मध्ये भारताने या दोन्ही संघांवर विजय मिळवला होता. तथापी, पाकिस्तानला तेव्हा अमेरिकेविरुद्धही अनपेक्षित पराभव स्वीकारावा लागला होता. 

हेही वाचा – Guwahati Test : गुवाहाटी कसोटीत अनोखा प्रयोग; सामना 30 मिनिटे लवकर अन् दुपारच्या जेवणाआधीच ‘चहा ब्रेक’! काय आहे यामागचं कारण

पाकिस्तानचे सर्व सामने श्रीलंकेतच

भारतामध्ये खेळण्यास नकार दिल्यामुळे पाकिस्तान त्यांचे सर्व गट सामने आणि नंतरच्या फेऱ्यांतील सामने श्रीलंकेतच खेळेल. पाकिस्तान उपांत्य किंवा अंतिम फेरीत पोहोचला तर त्यांचे सामनेही श्रीलंकेतच खेळवण्यात येणार आहेत. जर पाकिस्तान आणि श्रीलंका दोन्ही संघ अंतिम चारमध्ये पोहोचले नाहीत तर उपांत्य सामने भारतात खेळवले जातील.

फायनल कुठे?

अंतिम सामन्याचे ठिकाण ठरले नसले तरी मोठ्या प्रमाणात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये फायनल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version