India VS Pakistan Cricket Final Match : भारत-पाकिस्तान अंतिम सामना, जाणून घ्या सविस्तरपणे

आशिया कप क्रिकेटमध्ये भारत-पाकिस्तान अंतिम लढत निश्चित झाली आहे. पाकिस्तानने सुपर फोरमधील निर्णायक सामन्यात बांगलादेशला 11 धावांनी पराभूत करून फायनलमध्ये प्रवेश मिळवला.<br/>
India VS Pakistan Cricket Final Match : भारत-पाकिस्तान अंतिम सामना, जाणून घ्या सविस्तरपणे

आशिया कप क्रिकेटमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम लढत रंगणार आहे. दुबईत रविवारी होणाऱ्या या सामन्याची रंगत चांगलीच वाढली आहे. पाकिस्तानने सुपर फोरमधील निर्णायक सामन्यात बांगलादेशचा 11 धावांनी पराभव करून अंतिम फेरीत स्थान निश्चित केले. (India-Pakistan Final)

या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 135 धावा केल्या. त्यांची सुरुवात अत्यंत खराब झाली होती. पहिल्या 10 चेंडूतच 2 गडी बाद झाले. तास्किन अहमद आणि माहेदी हसन यांनी अचूक गोलंदाजी करत पाकिस्तानला 5-2 अशा कठीण परिस्थितीत ढकलले. मोहम्मद हारिसने 31 धावांची लढाऊ खेळी केली. त्याला शाहीद शाह आफ्रिदी आणि मोहम्मद नवाज यांनी साथ दिली. पण नियमित अंतराने गडी बाद झाल्याने पाकिस्तान मोठा डाव उभा करू शकला नाही.

हेही वाचा – BCCI Complaint to ICC : फरहान-रऊफ याच्या वादग्रस्त हावभावांवर BCCI ची ICC कडे तक्रार 

लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशालाही सुरुवातीला धक्का बसला. पॉवरप्लेमध्ये त्यांचे 3 गडी परतले. शमीम हुसेनने 30 धावा करून थोडी आशा दाखवली. मात्र शाहीद शाह आफ्रिदी आणि हॅरिस रऊफ यांच्या भेदक माऱ्यामुळे बांगलादेशाचा डाव कोसळला. अखेरीस त्यांना विजयासाठी आवश्यक धावसंख्या गाठता आली नाही आणि ते 11 धावांनी पराभूत झाले.

हेही वाचा – Asia Cup 2025 Points Table: पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर सुपर-4 मध्ये भारत अव्वल; पहा आगामी सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक 

या पराभवामुळे बांगलादेश आणि श्रीलंका स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. आता रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पारंपरिक लढत अंतिम फेरीत पाहायला मिळणार आहे. आधीच्या दोन्ही सामन्यांत भारताने विजय मिळवला असला तरी दोन्ही संघांमध्ये तणावाचे वातावरण दिसले. अशा पार्श्वभूमीवर येत्या रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्याची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांमध्ये निर्माण झाली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version