दक्षिण आफ्रिकेविरुद्धची पहिली T20 भारताने जिंकली

भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चार सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेतील पहिला सामना जिंकला.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धची पहिली T20 भारताने जिंकली

डरबन : भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चार सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेतील पहिला सामना जिंकला. डरबन येथे झालेला दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना भारताने ६१ धावांनी जिंकला. या सामन्यात नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने प्रथम फलंदाजी करत वीस षटकांत आठ बाद २०२ धावा केल्या. धावांचा पाठलाग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने १७.५ षटकांत सर्वबाद १४१ धावा केल्या. भारताच्या संजू सॅमसनने डरबनमधील सामन्यात ५० चेंडूत दहा षटकार आणि सात चौकारांच्या जोरावर १०७ धावा केल्या. या कामगिरीमुळे संजू सॅमसन डरबनमधील सामन्यात सामनावीर झाला. डरबनमध्ये मिळालेल्या विजयामुळे भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चार सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेत १ – ० अशी आघाडी घेतली. मालिकेतील दुसरा सामना रविवारी १० नोव्हेंबर रोजी गकेबरहा येथे होणार आहे.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, चार सामन्यांची टी २० मालिका

शुक्रवार ८ नोव्हेंबर २०२४ – पहिला सामना – किंग्समेड, डरबन – भारताचा ६१ धावांनी विजय
रविवार १० नोव्हेंबर २०२४ – दुसरा सामना  – सेंट जॉर्ज पार्क, गकेबरहा – थेट प्रक्षेपण रात्री ७.३० पासून
बुधवार १३ नोव्हेंबर २०२४ – तिसरा सामना – सुपरस्पोर्ट्स पार्क, सेंच्युरिअन – थेट प्रक्षेपण रात्री ८.३० पासून
शुक्रवार १५ नोव्हेंबर २०२४ – चौथा सामना – वाँडर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग – थेट प्रक्षेपण रात्री ८.३० पासून

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version