DC vs GT IPL 2026 : ‘तो’ एक निर्णय चुकला अन् दिल्लीच्या हातात असलेली मॅच निसटली; एका फरकाने दिल्लीचा धुव्वा उडवला

आयपीएल 2026 च्या 14 व्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स हे दोन संघ दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट मैदानात आमने-सामने आले.
DC vs GT IPL 2026 : ‘तो’ एक निर्णय चुकला अन् दिल्लीच्या हातात असलेली मॅच निसटली; एका फरकाने दिल्लीचा धुव्वा उडवला

आयपीएल 2026 च्या 14 व्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स हे दोन संघ दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट मैदानात आमने-सामने आले. दिल्लीच्या मैदानात गुजरातने आपला झेंडा रोवला आहे. गुजरातने अवघ्या एका रनच्या फरकाने आणि 4 गडी गमावत दिल्लीवर दणदणीत विजय मिळवला आहे. नाणेफेकीचा कौल दिल्लीच्या बाजूने लागल्यानंतर दिल्लीने सर्वप्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरातने दिल्लीसमोर 210 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र दिल्ली या आव्हानाचे पाठलाग करण्यात अयशस्वी ठरली.

यावेळी दिल्लीने 8 गडी गमावत 209 धावा केल्या. यावेळी गुजरातकडून कॅप्टन शुबमन गिल, वॉशिंग्टन सुंदर आणि जोस बटलर या तिघांनी सर्वाधिक खेळी केली. कॅप्टन शुबमन गिल याने सर्वाधिक 70 धावा केल्या तर वॉशिंग्टन सुंदर याने 55 धावांची कामगिरी केली. जोस बटलर याने देखील 52 धावा करत आपले योगदान दिले. 

हेही वाचा- RR vs MI IPL 2026 : गुवाहाटीत 'पटलन'ची गाडी पलटी! मुंबईचा सलग दुसरा पराभव तर पॉइंट्स टेबलमध्ये राजस्थानची अव्वल कामगिरी

तर दुसरीकडे दिल्लीकडून एकटा केएल राहुल गुजरातवर भारी पडला होता. त्याने एकट्याने 52 बॉलमध्ये 92 धावा करत अप्रतिम खेळी केली. यावेळी केएल राहुलने 11 चौकार आणि 4 षटकाराच्या मदतीने 92 धावांचे योगदान दिले. तर त्याच्यासोबत पाथुम निसांका याने 24 चेंडूत 41 धावांचे योगदान दिले. मोहम्मद सिराजच्या 19 व्या ओव्हरमध्ये दिल्लीनं 23 धावा काढल्या. तसेच डेव्हीड मिलर दुखापतग्रस्त असताना देखील मिलरने 20 चेंडूत 41 धावा केल्या. दिल्लीला शेवटच्या ओव्हरमध्ये 13 धावांची गरज होती.

यावेळी मिलर दिल्लीच्या विजयाचे कारण ठरणारच होता की, त्याची एक चुक संपूर्ण संघासाठी महागात पडली. पाचव्या बॉलवर डेव्हिड मिलरनं रन घेतली नाही. यामुळे शेवटच्या चेंडूवर 2 धावा हव्या असताना प्रसिध कृष्णा याने टाकलेल्या बॉलवर मिलरने फटका मारला नाही तर तो चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना गुजरातचा विकेटकीपर जोस बटलर याने स्ट्राईकवर हुशारीने कुलदीप यादव याला रन आऊट केलं. यामुळे मिलरने ती 1 धाव घेतली असती तर किमान सामना बरोबरीत सुटला असता. मात्र मिलरचा एकेरी धाव न घेण्याचा निर्णय चुकीचा ठरला. परिणामी दिल्लीला 1 धावेने सामना गमवावा लागला. तसेच यावेळी दिल्लीच्या गोलंदाजांबद्दल बोलायच झाल तर दिल्लीसाठी मुकेश कुमार याने 2 विकेट्स मिळवल्या. तर लुंगी एन्गिडी आणि कुलदीप यादव या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version