नक्षल्यांचा खात्मा करणाऱ्या जवानांचा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते सत्कार

नक्षल्यांचा खात्मा करणाऱ्या जवानांचा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते सत्कार

  गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत २६ नक्षलवाद्यांना ठार करण्यात महाराष्ट्र पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस जवानांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार केला आहे.

  गडचिरोली जिल्ह्यातील मर्दिन टोला जंगल परिसरात कोम्बिंग ऑपरेशन करून माओवाद्यांच्या सेंट्रल कमिटीचा सदस्य असलेल्या मिलिंद तेलतुंबडेसह 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. नक्षलविरोधी पोलीस तुकड्यांचे कमांडर, सी-६० पथकाचे जवान, ऑपरेशन मुख्य असलेले अतिरिक्त पोलीस अधिक्षक सोमय मुंडे आणि पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांचा महाराष्ट्र शासनाकडून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

  गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस जवानांचे कौतुक केले. तसेच गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी युवकांना आगामी पोलीस भरतीमध्ये प्राधान्य देण्याचे आश्वासन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहे.

गडचिरोलीत चकमकीत २६ नक्षलवादी ठार

  गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जंगल परिसरात पोलिसांचे सी-६० पथक शोध अभियान राबवत होते. यावेळी नक्षलवाद्यांनी सी-६० पथकावर गोळीबार सुरू केला. नक्षलवादी आणि महाराष्ट्र पोलिसांच्या चकमकीत २६ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात महाराष्ट्र पोलिसांना यश आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version