MS Dhoni : IPL 2026 आधी CSK फॅन्ससाठी आनंदाची बातमी! ‘त्या’ प्रकरणातून धोनीला क्लिन चीट

आयपीएल 2026 पूर्वीच चेन्नई सुपर किंग्जसाठी मोठी बातमी समोर आली आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये भारताचा माजी कॅप्टन महेंद्र सिंह धोनी याच्या विरोधात एक तक्रार दाखल करण्यात आली होती.
MS Dhoni : IPL 2026 आधी CSK फॅन्ससाठी आनंदाची बातमी! ‘त्या’ प्रकरणातून धोनीला क्लिन चीट

आयपीएल 2026 पूर्वीच चेन्नई सुपर किंग्जसाठी मोठी बातमी समोर आली आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये भारताचा माजी कॅप्टन महेंद्र सिंह धोनी याच्या विरोधात एक तक्रार दाखल करण्यात आली होती. धोनी एक ॲक्टिव्ह प्लेयर असतानाही क्रिकेट अकॅडमीचा मालक असल्याचा दावा करत, बीसीसीआयच्या 'कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट' नियमांच्या कलम 38(4)(ए) आणि 38(4)(पी) चे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर बीसीसीआयचे एथिक्स ऑफिसर जस्टिस अरुण मिश्रा यांनी धोनीच्या विरोधात करण्यात आलेले हे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहे.

हेही वाचा- Kavya Maran Buys Pakistani Player: काव्या मारन यांच्या फ्रँचायझीची मोठी खेळी; 2.34 कोटी खर्च करून खरेदी केला 'हा' पाकिस्तानी खेळाडू
ठोस पुरावे नसल्यामुळे थालाला क्लिन चीट
यावेळी बीसीसीआयचे एथिक्स ऑफिसर जस्टिस अरुण मिश्रा यांनी धोनीला क्लिन चीट देत म्हटलं की, बोर्डाच्या नियमांचे धोनीने उल्लंघन केल्याचे कोणत्याही प्रकारचे ठोस पुरावे उपलब्ध नाही. धोनीला एका क्रिकेट अकॅडमीचा मालक मानलं जाऊ शकतं, परंतु त्यामागचे तांत्रिक पैलू महत्त्वाचं आहेत. धोनी आणि आरका स्पोर्ट्स यांच्यातील करार 2017 मध्ये झाला होता, तर बीसीसीआयचे संबंधित रेगुलेशन सप्टेंबर 2018 मध्ये लागू झाले. ज्या काळात धोनीने टीम इंडियाचा कॅप्टन किंवा प्लेयर म्हणून प्रतिनिधित्व केले, त्यावेळेस नियमांचा कोणताही भंग झाला नाही. यामुळे धोनीला या प्रकरणातून पूर्णपणे क्लीन चिट मिळाली आहे. 

चेन्नई सुपर किंग्सचे सामने कधी?

आयपीएलच्या आगामी हंगामाची (IPL 2026) प्रतीक्षा आता संपली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आयपीएल 2026 च्या पहिल्या टप्प्याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. यंदाच्या हंगामाचा सलामीचा सामना 28 मार्च 2026 रोजी खेळला जाईल. विशेष म्हणजे, यंदा पहिल्या शनिवारी आणि रविवारी कोणताही 'डबलहेडर' (एकाच दिवशी दोन सामने) नसेल, तर दिवसाचे दोन सामने खेळण्याची सुरुवात 4 एप्रिलपासून होणार आहे. सीएसके अर्थात चेन्नई सुपर किंग्स यंदा वर्ल्ड कप चॅम्पियन संजू सॅमसन याच्यासोबत आयपीएलच्या 19 व्या मोसमात खेळणार आहे. जाणून घ्या चेन्नई सुपर किंग्जचं आयपीएल 2026 च्या पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक
चेन्नई सुपर किंग्स (CSK)
30 मार्च 2026 (सोमवार): RR विरुद्ध CSK: गुवाहाटी
3 एप्रिल 2026 (शुक्रवार): CSK विरुद्ध PBKS: चेन्नई
5 एप्रिल 2026 (रविवार): RCB विरुद्ध CSK: बेंगळुरू
11 एप्रिल 2026 (शनिवार): CSK विरुद्ध DC: चेन्नई

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version