‘गिरीश कुबेर शिवद्रोही’; संभाजी ब्रिगेडची प्रतिक्रिया

‘गिरीश कुबेर शिवद्रोही’; संभाजी ब्रिगेडची प्रतिक्रिया

ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली. नाशिकमध्ये सुरु असलेल्या साहित्य संमेलनस्थळी हा प्रकार घडला. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून शाईफेक करण्यात आली आहे. तसेच गिरीश कुबेर शिवद्रोही असल्याची प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेडकडून देण्यात येत आहे.

गिरीश कुबेर यांनी ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली असल्याचा असा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. स्वतःच्या पुस्तकांमध्ये सोयराबाई महाराणी साहेब यांचा खून संभाजीराजांनी केला असे वादग्रस्त आणि संतापजनक लिखाण गिरीश कुबेर यांनी केल्याचे संभाजी ब्रिगेडचे म्हणणे आहे. मुख्यमंत्र्यांनी गिरीश कुबेर यांच्या पुस्तकावर बंदी घालावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.

छत्रपती संभाजी महाराजांबद्दल लिहिलेल्या अग्रलेखाबद्दल आक्षेप घेत शाईफेक करण्यात आली. शाईफेक केल्यानंतर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी शाई फेकणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले असून ते दोघेही संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अशा प्रकारे शाईफेक करून भ्याड हल्ला करणं निषेधार्ह असल्याची प्रतिक्रिया सर्वच स्तरातून उमटू लागली आहे. सतीश काळे आणि राजेश बुंदला अशी या दोघांची नावं असल्याची माहिती खुद्द संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी नितीन रोटे पाटील यांनी दिली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version