गुवाहटीत पार पडलेल्या भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा लज्जास्पद पराभव झाला. दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं भारताला 408 धावांनी पराभूत करत ही कसोटी मालिका 2-0 अशा फरकाने जिंकली. एवढचं नाही तर तब्बल 25 वर्षांनंतर भारतात ऐतिहासिक विजयाची नोंद केली. भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानची कसोटी मालिका भारतीय चाहत्यांसाठी मोठी निराशा ठरली आहे.
भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिकेच्या कसोटी मालिकेतील लाजिरवाण्या पराभवानंतर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याच्यावर टीकांची झोड होत आहे. मात्र अस असताना सामन्याच्या पराभवात प्रत्येक खेळाडूचा दोष असला तरी त्याची सुरुवात माझ्यामुळे झाली असं म्हणत या पराभवाची जबाबदारी गौतम गंभीरनं स्वीकारली आहे. गौतम गंभीरने टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी घेतल्यापासून टीम इंडिया एकही सामना जिंकू शकला नाही.
याऊलट टीम इंडियाचा प्रत्येक स्पर्धेतील रेकॉर्ड आणि फॉर्म देखील चांगला पाहायला मिळाला नाही. त्यात आता भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिकेच्या कसोटी मालिकेत पतकारावा लागलेला पराभव पाहून क्रिकेटप्रेमींमध्ये संताप पाहायला मिळत असून गौतम गंभीरने मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जात आहे. याचपार्श्वभूमिवर गौतम गंभीरने गुवाहाटी पत्रकार परिषदेत बोलताना प्रत्येक प्रश्नाची शांतपणे उत्तरे दिली आहेत.
हेही वाचा- IND vs SA: भारतासाठी सर्वात वाईट दिवस! 'या' 5 खेळाडूंनी कापलं टीम इंडियाचं नाक
यावेळी गौतम गंभीर म्हणाला की, "माझ्या भवितव्याचा निर्णय बीसीसीआय घेईल. इंग्लंडमध्येही माझ्या मार्गदर्शनाखाली चांगला खेळ केला. तसेच माझ्या मार्गदर्शनाखाली चँपियन्स ट्रॉफी, आशिया चषक ही स्पर्धा जिंकली हेही लक्षात ठेवा" त्याने केलेल्या या वक्तव्यामुळे तो प्रशिक्षकपदाचा राजीनामा देण्याच्या मनस्थितीत नसल्याचे स्पष्ट होत आहे.
पुढे गौतम गंभीर म्हणाला की, "लोक हे विसरतात. मी तोच माणूस आहे ज्याने इंग्लंडमध्ये एका तरुण संघासोबत रिजल्ट दिला होता. तुम्ही लोक हे लवकरच विसरून जाल. बरेच लोक न्यूझीलंडबद्दल बोलतात. मी तोच माणूस आहे, ज्याच्या नेतृत्वाखाली आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया कप जिंकला आहे. हा संघ कमी अनुभवी आहे. आणि मी हे आधीही म्हटले आहे की, त्यांना शिकत राहावे लागेल आणि परिस्थिती बदलण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत." असं गौतम गंभीरने दुसरा कसोटी सामना संपल्यानंतर सांगितले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.