सध्या सर्वत्र क्रिकेटप्रेमींमध्ये आयपीएल 2026 स्पर्धेची उत्सुकता लागली आहे. आयपीएल 2026 स्पर्धेची जोरदार चर्चा रंगली असताना इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी हंगामासाठी लिलाव कधी पार पडणार याकडे क्रिकेटप्रेमींच लक्ष लागलं आहे. 16 डिसेंबरला मिनी लिलाव प्रक्रिया दुबईमध्ये पार पडणार आहे. ही दुसरी वेळ आहे ज्यावेळे आयपीएलची लिलाव प्रक्रिया दुबईमध्ये पार पडणार आहे. यापुर्वी 2024 मध्ये आयपीएलची लिलाव प्रक्रिया पार दुबईमध्ये घेण्यात आली होती. आगामी हंगामासाठी मिनी लिलाव डिसेंबरमध्ये पार पडणार असून त्यापुर्वी सर्व संघ त्यांच्या राखलेल्या खेळाडूंना रिलीज करतील. तसेच 15 नोव्हेंबर रोजी यादी लाईव्ह होईल, याचाच अर्थ असा की, प्रत्येक संघाला कळणार आहे की, प्रत्येक संघाने कोणत्या खेळाडूला रिलीज केले आहे आणि कोणत्या खेळाडूला राखण्याचा निर्णय घेतला आहे. पण, तुम्हाला माहित आहे का? आयपीएल स्पर्धेदरम्यान असे काही खेळाडू आहेत ज्यांना त्यांच्या संघाने कधीही रिलीज केले नाही. जाणून घ्या हे खेळाडू कोण आहेत.
यामध्ये पहिलं नाव येत ते सचिन तेंडुलकर, भारतात क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरला मुंबईन इंडियन्स संघाने कधीही आपल्या संघातून रिलीज केले नाही. सचिन तेंडुलकरने २००८ ते २०१३ पर्यंत मुंबई इंडियन्सकडून आयपीएल स्पर्धेत आपली प्रभावी कामगिरी दाखवली. त्यानंतर तो त्याने आयपीएलमधून निवृत्ती घेतली. तरी देखील त्याने मुंबईन इंडियन्स संघाची साथ कधी सोडली नाही. नंतर तो मुंबईन इंडियन्स संघाचा मार्गदर्शक बनला.
यानंतर चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार एमएस धोनी याने देखील २००८ पासून चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी आपले नेतृत्त्व उत्तमरित्या बजावले आणि तो अजून देखील चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी खेळत आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली संघाने पाच वेळा आपलं नाव आयपीएल स्पर्धेच्या चॅम्पियनशिप ट्रॉफीवर कोरले.
हेही वाचा – IND vs PAK : रायझिंग स्टार्स आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तानची टक्कर; जितेश शर्माच्या नेतृत्वात टीम सज्ज
यानंतर 2025 मध्ये चर्चेत आलेला संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा खेळाडू किंग कोहली म्हणजेच विराट कोहली हा २००८ पासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा भाग आहे. आयपीएलच्या पहिल्या आवृत्तीपासून आरसीबीने त्यांचे पहिले आयपीएल विजेतेपद जिंकले.एकदाही विजेतेपद जिंकले नाही, तरी देखील विराट कोहलीने संघाची साथ सोडली नाही. 2025 मध्ये तब्बल १८ वर्षांनंतर आरसीबी संघाने त्यांचे पहिले आयपीएल विजेतेपद जिंकले.
कोलकाता नाईट रायडर्सचा वेगवान गोलंदाज सुनील नरेनने २०१२ मध्ये संघात पदार्पण केले. नरेनने केकेआरसाठी अनेक सामना जिंकणारे स्पेल गोलंदाजी केली आहे. सुनील नरेन हा वेस्ट इंडिजचा फिरकी गोलंदाज म्हणून ओळखला जातो. २००८ ते २०११ पर्यंत राजस्थान रॉयल्सला साथ देणाऱ्या शेन वॉर्नचं मार्च २०२२ मध्ये त्यांचे निधन झाले. कर्णधार म्हणून वॉर्नने राजस्थान रॉयल्सला त्यांचे पहिले आयपीएल जेतेपद मिळवून दिले. फ्रँचायझीने त्याला कधीही सोडले नाही.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.