Rohit Sharma Fan Moment : रोहितला पाहताच ती किंचाळली, सेल्फीसाठी धावत आली, पण फोन…; पाहा काय म्हणाला रोहित शर्मा, मजेशीर व्हिडीओ व्हायरल

Rohit Sharma Fan Moment : रोहितला पाहताच ती किंचाळली, सेल्फीसाठी धावत आली, पण फोन…; पाहा काय म्हणाला रोहित शर्मा, मजेशीर व्हिडीओ व्हायरल

मुंबई : भारतीय क्रिकेट संघातील सर्वाधिक लोकप्रिय खेळाडू आणि मुंबई इंडियन्सची शान रोहित शर्मा याची क्रेझ लहान मुलांपासून तरुणांपर्यंत ते अगदी महिलांमध्येही मोठ्या प्रमाणात आहे. अशीच एक रोहितची जबरी फॅन त्याला नुकतीच भेटली. या महिलेने रोहितला पाहताच आपला आनंद व्यक्त केला. नक्कीच इतरांप्रमाणे तिलाही रोहितसोबत सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही. या क्षणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रोहितला पाहून ती किंचाळली, त्याच्या दिशेने धावत आली, रोहितसोबत शेक हँड केले आणि सेल्फी घेण्यासाठी आपला मोबाईल काढला. परंतू त्या महिलेचा फोन स्वीच ऑफ असल्याचे तिच्या लक्षात आले. दरम्यान, रोहितचे एका लहानग्या मुलासोबत फोटो काढून घेतला आणि तो त्याच्या बसच्या दिशेने निघाला. आपल्या आवडत्या क्रिकेटरसोबत सेल्फी घेता आला नाही, म्हणून महिलेचा हिरमोड झाला, हे तिच्या बोलण्यातून दिसून आले. त्या महिलेने रोहितला थांबण्याची विनंती केली. दुसरा फोन घेत अखेर महिलेला रोहितसोबत सेल्फी घेता आला. हा फॅन मुमेंट महिलेने आनंद व्यक्त करून साजरा केला. मात्र या ठिकाणी रोहितची औघडणारी स्थितीदेखील दिसून आली. 

हेही वाचा : DC Vs KKR IPL 2026: ‘…तरच निकाल वेगळा लागला असता’, दिल्लीच्या सलग होणाऱ्या पराभवानंतर अक्षर पटेलने कोणावर फोडले खापर?

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version