मराठी भाषा न शिकवणाऱ्या इंग्रजी शाळांना लाखाचा दंड

मराठी भाषा न शिकवणाऱ्या इंग्रजी शाळांना लाखाचा दंड

   महाराष्ट्रात मराठी भाषा महत्त्वाची मानली जाते. तसेच इंग्रजी शाळांमध्येही मराठी भाषा शिकवणे बंधनकारक करण्यात आले आहे. मराठी भाषा न शिकवणाऱ्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांना आता एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.

  गडचिरोली जिल्ह्यातील ज्या इंग्रजी माध्यम शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जाणार नाही अशा शाळांकडून १ लाख रुपयांचा दंड वसूल करण्याचा आदेश शिक्षण संचालकांकडून देण्यात आला आहेत.

  ज्या इंग्रजी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मराठीचे धडे शिकवले जाणार नाहीत अशा इंग्रजी माध्यमांच्या शाळांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. शिक्षण संचालकांच्या या कारवाईच्या आदेशामुळे अनेक इंग्रजी माध्यमातील शाळा अलर्ट झाल्या आहेत.

  शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे हा कायदा २०२०मध्ये मंजूर करण्यात आला. त्यामुळे या कायद्याच्या अंतर्गत इंग्रजी शाळांमध्येही मराठी भाषा शिकवणे अनिर्वाय आहे. मात्र तरिही अनेक इंग्रजी शाळामध्ये मराठी भाषा शिकवणीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे मराठी भाषा न शिकवणाऱ्या शाळांकडून एक लाख रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version