भारतीय संघाला विश्वचषक स्पर्धेत अजून एक धक्का बसला आहे. आता विजय शंकर या अष्टपैलू खेळाडूला देखील संघातून बाहेर पडावे लागले आहे. शिखर धवनप्रमाणेच आता विजय शंकरलासुद्धा दुखापत झाल्याने संघातून बाहेर पडावे लागले. त्यामुळे भारतीय संघापुढील अडचणींमध्ये आणखीच वाढ झाली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयंक अग्रवालला विजय शंकरच्या जागी बोलविण्यात येणार आहे.
नेटप्रॅक्टीस दरम्यान जसप्रीत बुमराहकडून विजय शंकरच्या पायाला बॉल लागला होता. मात्र ही गंभीर दुखापत नसल्यानं विजय शंकरचीच वर्णी लागण्याची माहिती देण्यात आली होती. परंतु ही गंभीर दुखापत असल्याने विजय शंकरला आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
विजय शंकरच्या जागी दुसऱ्या खेळाडूला संधी देण्यात यावी अशी विनंती बीसीसीआयने आयसीसीकडे केली आहे.
नेट प्रॅक्टीसदरम्यान जसप्रीत बुमराहचा बॉल विजय शंकरच्या घोट्याला लागला. त्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली.
म्हणून वर्डकपमध्ये खेळता येणार नाही. स्पर्धेत आता त्याला खेळता येणार नाही. त्यामुळे विजय शंकरला घरी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यामुळे आता मयंक अग्रवालला ‘भारतीय संघ व्यवस्थापनाकडून संधी मिळण्याची शक्यता आहे. ओपनिंग फलंदाज असल्याने मयंक अग्रवाल के.एल.राहुलची जागा घेऊ शकतो. असं ही म्हटलं जात आहे.
त्याचप्रमाणे आगामी दोन सामन्यांमध्ये ऋषभ पंत आपली चांगली कामगिरी दाखवू शकला नाही, तर चौथ्या क्रमांकावर के.एल राहुलला खेळविले जाण्याचा विचार करण्यात येईल.अशी ही चर्चा आहे.
ऑस्ट्रेलिया संघाविरोधात झालेल्या कसोटी सामन्यादरम्यान मयांक अग्रवाल याने भारतीय संघात आगमन केले होते.परंतु एकदिवसीय संघात खेळण्याची संधी त्याला अद्याप मिळाली नाही.
पण आता मात्र विश्वचषक स्पर्धेत खेळण्याची सुवर्णसंधीच त्याच्याकडे थेट चालून आली आहे. असे म्हटलं जात आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.