छत्रपती संभाजीनगर : आषाढी वारीमध्ये सहभागी होण्यासाठी संत एकनाथ महाराजांची पालखी पैठण येथून पंढरपूर येथे जात असते. यंदाही पालखी २८ जून रोजी पैठण येथून पंढरपूरसाठी प्रस्थान करणार आहे. या पालखीच्या सर्व नियोजनाची तयारी करण्यात येत असल्याची माहिती पालखी सोहळा प्रमुख रघुनाथ महाराज पालखीवाले यांनी दिली आहे. नाथ महाराज पालखी २८ जून रोजी प्रस्थान होणार आहे. तर पुढील १९ दिवसांचा पायी प्रवास करून १६ जुलै रोजी ही पालखी पंढरपूर येथे पोहोचणार आहे. यासाठी मराठवाड्यातील दिंड्यासाठी प्रशासनाने बैठक घेऊन वारकऱ्यांना सुविधा द्यावी अशी मागणी रघुनाथ महाराज पालखीवाले यांनी केली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.