Unrecognized League Goa: BCCI शी पंगा महागात पडला! अमान्य लीगमध्ये खेळल्याने ऑस्ट्रेलियन-इंग्लिश खेळाडूंना मोठा फटका

इंग्लंडमधील प्रतिष्ठित 'T20 ब्लास्ट' स्पर्धा सुरू होण्याच्या काही दिवस आधीच दोन दिग्गज खेळाडूंवर बंदी घालण्यात आली आहे.
Unrecognized League Goa: BCCI शी पंगा महागात पडला! अमान्य लीगमध्ये खेळल्याने ऑस्ट्रेलियन-इंग्लिश खेळाडूंना मोठा फटका

Unrecognized League Goa: क्रिकेट विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका 'अमान्य' (unrecognized) लीगमध्ये सहभागी झाल्यामुळे अनुभवी खेळाडूंना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागले आहे. इंग्लंडमधील प्रतिष्ठित 'T20 ब्लास्ट' स्पर्धा सुरू होण्याच्या काही दिवस आधीच दोन दिग्गज खेळाडूंवर बंदी घालण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पीटर सिडल आणि इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू समित पटेल यांना यावर्षीच्या स्पर्धेत खेळण्यापासून रोखण्यात आले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला गोव्यात आयोजित करण्यात आलेल्या एका लीगमध्ये खेळल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

BCCI ची मान्यता नसलेली लीग ठरली कारणीभूत
मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये गोव्यात 'वर्ल्ड लेजेंड्स प्रो T20 लीग' पार पडली होती. या स्पर्धेला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) कोणतीही अधिकृत मंजुरी नव्हती. ECB (इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड) च्या नियमानुसार, जर एखादा खेळाडू अशा अमान्य लीगमध्ये सहभागी झाला, तर तो पुढील 12 महिन्यांसाठी 'काउंटी क्रिकेट' खेळण्यास अपात्र ठरतो. या नियमाच्या आधारे सिडल आणि पटेल या दोघांवरही ही कारवाई करण्यात आली आहे.

पीटर सिडलचा करार संपुष्टात
41 वर्षीय पीटर सिडल या हंगामात 'नाटिंगहॅमशायर' संघाकडून परदेशी खेळाडू म्हणून मैदानात उतरणार होता. मात्र, 21 एप्रिल रोजी क्लबने अधिकृत घोषणा करत त्याचा करार समाप्त केल्याचे जाहीर केले. क्लबचे क्रिकेट संचालक मिक न्यूवेल यांनी यावर नाराजी व्यक्त केली असून, आता संघ सिडलच्या जागी दुसऱ्या पर्यायी खेळाडूचा शोध घेत असल्याचे सांगितले आहे. अनुभवी गोलंदाज अचानक बाहेर गेल्याने नाटिंगहॅमशायर संघासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

हेही वाचा – IPL 2026 CSK : धोनीचा लाडका 19 व्या मोसमाला मुकणार; चेन्नईची चिंता वाढली; दुखापतीमुळे मॅचविनर बॅट्समॅनची IPL मधून एक्झिट

समित पटेलचा ऐतिहासिक विक्रम मोडणार
दुसरीकडे, 41 वर्षीय समित पटेल यालाही या निर्णयाचा मोठा फटका बसला आहे. पटेल हा अशा मोजक्या खेळाडूंपैकी एक आहे, ज्याने 2003 मध्ये T20 ब्लास्ट स्पर्धा सुरू झाल्यापासून आजपर्यंतच्या प्रत्येक हंगामात सहभाग नोंदवला होता. रवी बोपारासोबतच्या या विक्रमी यादीत त्याचे स्थान होते, परंतु यावर्षीच्या बंदीमुळे त्याची ही मालिका खंडित होणार आहे. पटेलने ECB चा निर्णय मान्य केला असून, या वर्षासाठी T20 ब्लास्टमध्ये खेळण्याच्या आशा सोडून दिल्या आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version