देवबाग समुद्रात बोट उलटली, महिलेचा मृत्यू

देवबाग समुद्रात बोट उलटली, महिलेचा मृत्यू

सिंधुदुर्ग : मालवण तालुक्यातील देवबाग येथे पर्यटक बोट समुद्रात बुडाल्याची घटना घडली आहे. आज गुरुवारी दुपारी देवबाग संगम येथे घडली. या दुर्घटनेत एकूण 9 जण बुडाले. या 9 जणांपैकी 1 महिलेचा मृत्यू झाला. तर 8 जणांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

बोटिंग सफर करताना ही घटना घडली. या बोटीत पर्यटक होते. कल्याणमधील पर्यटक मालवण देवबाग येथे फिरण्यासाठी आले होते.

समुद्रात वाऱ्यांचा आणि लाटांचा जोर वाढला होता. बोटीतील पर्यटकही बोटीच्या एका बाजूला गेले. यामुळे ही घटना घडली असावी, अशी चर्चा आहे.

या घटनेत ५ महिला ३ लहान मुले आणि एक पुरुष असे ९ पर्यटक समुद्रात बु़डाले. पाण्यात पडलेल्या पर्यटकांना बोटीतील व्यावसायिकांनी बाहेर काढलं. तसेच स्थानिक रुग्णालयात दाखल केले. माया आंनद माने या वृद्ध महिलेचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. तर दोन महिला आणि एका लहान मुलांवर उपचार सुरू आहेत.

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आठही पर्यटकांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version