‘सरकार अल्पमतात येईल इतकी मतं भाजपला मिळतील’

‘सरकार अल्पमतात येईल इतकी मतं भाजपला मिळतील’

राज्यसभा निवकडणुकीत भाजपाचे तीनही उमेदवार विजयी झाल्यानंतर आता भाजपाने विधानसभा निवडणुकीसाठी रणनिती आखली आहे. भाजपाने पाच उमेदवार रिंगणात उतरवले आहेत, तसेच सदाभाऊ खोत अपक्ष निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे विधानसभेच्या सहाही जागेवर भाजप जिंकून येणार असून सरकार अल्पमतात येईल इतकी मतं भाजपला मिळतील, असा इशारा भाजप नेते प्रसाद लाड यांनी मविआला दिला आहे.

प्रसाद लाड म्हणाले, सदाभाऊ खोत अपक्ष निवडणूक लढवणार असून त्यांचा अर्ज भाजप पुरस्कृत आहे. राज्यसभेच्या निकालानंतर आमदार, अपक्ष आणि छोटी पक्ष यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावरील असलेला विश्वास सरकारला अल्पमतात आणण्याइतकं मतदान भाजप आणि पुरस्कृत उमेदवाराला मिळणार असल्याचा विश्वास प्रसाद लाड यांनी व्यक्त केला आहे.

प्रसाद लाड यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

प्रसाद लाड यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी भेट घेतली. विधानपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे या भेटीला मोठं महत्त्व प्राप्त झालं आहे. “मैत्रीमध्ये चर्चा न झालेली चांगली असते. निश्चतपणे राजसाहेब मला सहकार्य करतील याची मला खात्री आहे”, असं राज ठाकरेंच्या घराबाहेर पडताच प्रसाद लाड म्हणाले. तसेच, ‘राज ठाकरे आणि माझे कौटुंबिक संबंध आहेत. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आणि उद्या त्यांचा वाढदिवस आहे’, वाढदिवशी ते कोणालाही भेटणार नाहीयेत. म्हणून आज मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो”, असंही त्यांनी सांगितलं.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version