IND vs SA 3rd T20 : गिलचा पत्ता कट? पराभवानंतर टीम इंडिया ‘या’ खेळाडूला देणार ओपनिंगची संधी

दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा पराभव झाला. शुभमन गिलच्या सततच्या अपयशी फॉर्ममुळे नेटकऱ्यांकडून तिसऱ्या टी-20 साठी भारताच्या प्लेईंग 11 मध्ये बदल करण्याची मागणी केली जात आहे.
IND vs SA 3rd T20 : गिलचा पत्ता कट? पराभवानंतर टीम इंडिया ‘या’ खेळाडूला देणार ओपनिंगची संधी

गुरुवार, 11 डिसेंबर रोजी चंदीगडच्या नवीन स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 51 धावांनी भारतावर विजय मिळवला. क्विंटन डी कॉकने 46 चेंडूत 90 धावा केल्या, ज्यात सात षटकार आणि पाच चौकारांचा समावेश होता. दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला 19.1 ओव्हरमध्ये 162 रन्सवर ऑलआऊट केलं. परिणामी, दक्षिण आफ्रिकेने 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी केली आणि पहिल्या पराभवाची अचूक परतफेड केली.

हेही वाचा- Gold-Silver Price Today : सोने-चांदी दरात भूकंप! शिखरावर पोहचलेला उच्चांक पत्त्यांसारखा कोसळला; जाणून घ्या आजचे दर

या पराभवामुळे टीम इंडियाच्या फलंदाजांवर आणि विशेषतः मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर समोर मालिकेच्या पहिल्या सामन्यात, शुभमन गिलने अवघ्या 4 धावा काढल्या तर दुसरीकडे सूर्यकुमार यादवने केवळ 12 धावा काढल्या. तरी देखील शुभमन गिलला पुन्हा एकदा सलामीची संधी देण्यात आली ज्यात तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला, तर सूर्यकुमार यादवने फक्त 5 धावा केल्या. दर दुसरीकडे संजू सॅमसनने मागील वर्षी टी-20 क्रिकेटमध्ये तब्बल तीन शतके आणि  तीन अर्धशतके झळकावली आहेत.

हेही वाचा- Dhurandhar Akshaye Khanna Gemini Prompt : 'धुरंदर'मधील खलनायकाच्या लूकचा नवा ट्रेंड, रेहमान डकैतीच्या लूकसाठी तुमच्या फोटोवर AI चा 'हा' प्रॉम्ट वापरा

गिलच्या तुलनेत संजूचा रनरेट आणि सरासरी दोन्हीही जास्त प्रभावी आहे. शुभमन गिल त्याच्या सततच्या अपयशी फॉर्ममुळे नेटकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात ट्रोलिंच्या कचाट्यात सापडला आहे. इतकचं नव्हे तर शुभमन गिलसह कर्णधार सूर्यकुमार यादवच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित करत संघाच्या फलंदाजीवर चिंता व्यक्त केली आहे. अशा परिस्थिती टीम इंडियाला मजबूत करण्यासाठी चाहत्यांकडून संजू सॅमसनला टी-20 संघात सलामीवीर म्हणून संधी देण्याची जोरदार मागणी केली जात आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यातील तिसऱ्या टी-20 सामन्यापुर्वी जर शुभमन गिलला संघातून बाजूला ठेवण्यात आले तर त्याच्या जागी सलामीवीर म्हणून संजू सॅमसनला संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यानुसार तिसऱ्या टी-20 साठी टीम इंडियाच्या प्लेईंगमध्ये देखील बदल होईल. 

हेही वाचा- Cricket Match Fixing: क्रिकेटविश्वात खळबळ! मॅच फिक्सिंगप्रकरणी चार खेळाडूंविरोधात FIR, नेमकं प्रकरण काय?

संभाव्य तिसऱ्या टी-20 साठी भारताची प्लेईंग 11 : 
अभिषेक शर्मा, संजू सॅमसन/शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version