विधानसभा निवडणुकीत पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर आता आपने गुजरातकडे आपला मोर्चा वळवला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज गुजरातमध्ये दाखल झाले असून आम आदमी पक्षाचे मिशन गुजरात सुरू झाले आहे. यावेळी त्यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे देखील होते.
दरम्यान, अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान यांनी साबरमती आश्रमाला भेट दिली आणि गांधीजींना श्रद्धांजली वाहिली. आजपासून आपच्या जंगी दौऱ्याला सुरूवात झाली.
गुजरातमधील अहमदाबादमध्ये शनिवारी आपचे राष्ट्रीय संजोयजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे शक्तिप्रदर्शन पाहण्यात आले. यावेळी अरविंद केजरीवाल आमि भगवंत मान यांनी अहमदाबादमध्ये रोड शो केला. केजरीवाल यांच्या रोडशोला नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. या रोड शोच्या माध्यमातून अरविंद केजरीवाल यांनी पंजाबनंतर गुजरातमध्येही आपची सत्ता येण्याचा निर्धार केला आहे.
मात्र, अरविंद केजरीवाल यांचा गुजरात दौरा सत्ताधारी भाजप तसेच विरोधी पक्ष काँग्रेसचा चिंता वाढवणारा ठरला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.