Real Life Tapu Sena: खऱ्या आयुष्यातील टप्पू सेना! मैत्रीणीसाठी शाळेतील सर्व मुलींनी केलं मुंडण; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील

कर्करोगाशी झुंज देणाऱ्या आपल्या जिगरी मैत्रीणीचे मनोबल वाढवण्यासाठी एका शाळेतील मुलींनी एकत्र येत आपले केस कापले आहेत.
Real Life Tapu Sena: खऱ्या आयुष्यातील टप्पू सेना!  मैत्रीणीसाठी शाळेतील सर्व मुलींनी केलं मुंडण; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील

Real Life Tapu Sena: टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये आपल्या मित्राला साथ देण्यासाठी ‘टपू’ने केस कापल्याचा भाग आपण सर्वांनी पाहिला आहे. मात्र, आता असाच एक हृदयद्रावक प्रकार प्रत्यक्ष जीवनात घडला आहे. कर्करोगाशी झुंज देणाऱ्या आपल्या जिगरी मैत्रीणीचे मनोबल वाढवण्यासाठी एका शाळेतील मुलींनी एकत्र येत आपले केस कापले आहेत. या निरागस मैत्रीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, लोक या मुलांना “रिअल लाईफ टपू सेना” म्हणत आहेत.

नेमकी घटना काय?
व्हायरल होत असलेल्या दाव्यानुसार, या मुलींच्या गटातील एका मित्राला कर्करोग (Cancer) झाला आहे. केमोथेरपीच्या उपचारांमुळे त्या मुलीचे सर्व केस गळून गेले होते. आपला मैत्रीणीला शाळेत आल्यावर त्याला एकटे वाटू नये किंवा केसांशिवाय त्याला संकोच वाटू नये, म्हणून तिच्या वर्गातील सर्व मैत्रिणींनी एकत्र येऊन स्वतःचे केस कापण्याचा निर्णय घेतला.

व्हिडिओ पाहून नेटकरी भावूक
@gharkekalesh या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये, शालेय गणवेशात आणि पाठीवर दप्तर घेतलेली मुले रांगेत शाळेत प्रवेश करताना दिसत आहेत. या मुलांच्या डोक्यावर केस नाहीत. सुरुवातीला हा व्हिडिओ पाहताना काहीसा कुतूहल निर्माण करतो, मात्र त्यामागचे सत्य समजल्यावर पाहणाऱ्याच्या डोळ्यात पाणी येते. एका यूजरने म्हटलं आहे की, “ही खरी मैत्री आहे. संस्कार अशा कृतीतूनच दिसून येतात. या अद्भुत मुलांना माझा सलाम!” 

हेही वाचा – Stray Dogs: आता भटक्या कुत्र्यांनाही बसवणार मायक्रोचिप्स; 35 कोटींच्या योजनेमागचं नेमकं गुपित काय?

मैत्री आणि माणुसकीचे जिवंत उदाहरण

हा व्हिडिओ माणुसकी आणि निस्वार्थ मैत्रीचे उत्तम उदाहरण मानला जात आहे. लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून, त्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अनेक युजर्सनी कमेंट्समध्ये म्हटले आहे की, “आजच्या काळात जिथे लोक स्वार्थासाठी मैत्री करतात, तिथे या लहान मुलांनी जगाला मैत्रीची नवी व्याख्या शिकवली आहे.”
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version