लखनऊमधील एका व्यक्तीने सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांच्याविरोधात केली तक्रार दाखल

लखनऊमधील एका व्यक्तीने सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांच्याविरोधात केली तक्रार दाखल

संपूर्ण जगात कोरोनाचा थैमान सुरूच आहे. कोरोनापासून कसं वाचता येणार यासाठी अनेक देशांमध्ये कोरोनाच्या लसीसाठी संशोधन सुरू होते. भारतातही याबद्दल संशोधन सुरू होते. त्यानंतर भारतीला लस संशोधनात यश आलं. आता भारतात या लसीकरण सुरू आहे. मात्र लखनऊमधील एका व्यक्तीने सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार कोव्हिशिल्ड लस ही घेतल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचं काम करणाऱ्या अॅण्टीबॉडीज म्हणजेच प्रतिपिंडे निर्माण होत नसल्याची या व्यक्तीने तक्रार केली आहे. या व्यक्तीने लखनऊमधील आशियाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या तक्रारीत अदर पूनावाला यांच्याव्यतिरिक्त डीजीसीएचे संचालक, आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल, आयसीएमआरचे संचालक बलराम भार्गव, राष्ट्रीय आरोग्य मोहीम संचालक अपर्णा उपाध्याय यांची नावे असून आणखी काही व्यक्तिची नावं आहे. तक्रार करणाऱ्या व्यक्तीत नाव प्रताप चंद्रा आहे. तसेच मिळालेल्या माहितीनुसार, ८ एप्रिल रोजी कोव्हिशिल्ड लसीचा पहिला डोस त्यांनी घेतला होता. दुसरा डोज हा २८ दिवसांनी मिळणं अपेक्षित होतं. मात्र त्यादिवशी दुसऱ्या डोसचा कालावधी सहा आठवड्यांनी वाढवण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर सरकारने हा कालावधी १२ आठवड्यांसाठी वाढवला. प्रताप चंद्रा यांनी पहिला डोस घेतल्यानंतर त्यांना बरं वाटत नव्हतं असं त्यांनी सांगितलं, यावेळी त्यांनी आयसीएमआरचे संचालक बलराम भार्गव यांच्या वक्तव्याचा दाखला दिला ज्यामध्ये त्यांनी कोव्हिशिल्ड लसीच्या पहिल्या डोसनंतर शरीरात प्रतिपिंडे तयार होत असल्याचं म्हटल होतं. त्यानंतर प्रताप यांनी सरकारमान्य लॅबमध्ये चाचणी केली असता त्यांच्या शऱीरात कोरोनाशी लढण्यासाठी प्रतिपिंडे तयार झाली नसल्याचं निष्पन्न झालं. उलट त्यांच्या प्लेटलेट्स तीन लाखांहून दीड लाखांवर आल्या. लस घेतल्यानंतर आपल्या प्लेटलेटची संख्या निम्म्याने कमी झाली असून कोरोनाची लागण होण्याची शक्यता वाढली आहे, असा आरोप प्रताप चंद्रा यांनी केला आहे. त्यानंतर प्रताप यांनी पोलिस स्टेशनला धाव घेतली असून याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे, मात्र पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर दाखल केलेली नाही. प्रकरणाची संवेदनशीलता पाहता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याची माहिती देण्यात आली असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. तसेच प्रताप चंद्रा यांनी म्हटलं की, जर पोलिसांनी एफआयआर दाखल केला नाही तर कोर्टात जाऊ न्याय मागेलं असं त्यांनी सांगितलं.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version