कोलकाता, १४ मार्च २०२४, प्रतिनिधी : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्या कपाळाला दुखापत झाली आहे. तृणमूल काँग्रेसने ट्वीट करून ममता बॅनर्जी अपघातात जखमी झाल्याचे सांगितले. ट्वीटमध्ये तृणमूल काँग्रेसने ममतांसाठी प्रार्थना करा असे आवाहन केले आहे.
ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस या ट्विटर हँडलवरून तृणमूल काँग्रेसने ममता बॅनर्जी यांचे तीन फोटो ट्वीट केले आहेत. या फोटोंमध्ये ममता यांच्या कपाळाला दुखापत झाल्याचे आणि त्या दुखापतीतून रक्त ओघळत असल्याचे दिसत आहे. प्राथमिक वृत्तानुसार घरातच ट्रेडमिलवर व्यायाम करत असताना तोल गेल्यामुळे ममता यांच्या कपाळाला दुखापत झाली. सध्या ममता यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याआधी याचवर्षी जानेवारी २०२४ मध्ये वातावरण प्रतिकूल झाल्यामुळे हेलिकॉप्टरद्वारे प्रवास करणे कठीण झाले होते. बर्धमान येथून कोलकाताला रस्ते मार्गाने वाहनातून येत असताना अपघात झाला. या अपघातात ममता बॅनर्जी यांच्या डोक्याला हलकी दुखापत झाली होती. तर २०२१ मध्ये धुक्यातून रस्ते मार्गाने जाताना वाहनाचे ब्रेक जोरात लावले आणि ममता यांच्या पायांना दुखापत झाली. या दुखापतीमुळे काही काळ ममता व्हीलचेअर वापर करत होत्या.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.