मोहम्मद शमीसाठी पंतप्रधानांच्या खास शुभेच्छा

मोहम्मद शमीसाठी पंतप्रधानांच्या खास शुभेच्छा

मुंबई, २८ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : भारताचा सुप्रसिद्ध गोलंदाज मोहम्मद शमीची सोमवारी यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धा झाल्यानंतर तो दुखापतग्रस्त झाला होता. तेव्हापासून त्याला क्रिकेटच्या मैदानापासून आराम आहे. यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याची माहिती त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली आहे. त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर रुग्णालयातील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोवर क्रिकेट फॅन्ससह देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्याला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

नरेंद्र मोदी यांनी शमीची एक्स (ट्विटर) पोस्ट रिपोस्ट केली आहे. ज्यावर त्यांनी कॅप्शन म्हणून,’ तुम्ही लवकरात लवकर बरे व्हावे आणि तुम्हाला चांगले आरोग्य मिळावे अशी प्रार्थना करतो. मला खात्री आहे की, तुम्ही या दुखापतीवर धैर्याने मात कराल.’ असं लिहिलं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version