आयपीएलचे पुरस्कर्ते टाटाच !

आयपीएलचे पुरस्कर्ते टाटाच !

मुंबई, २० जानेवारी २०२४, प्रतिनिधी : टायटल स्पॉन्सरर अर्थात स्पर्धेच्या नावाचे पुरस्कर्ते होण्यासाठी टाटा समुहाने आयपीएलचे २०२८ पर्यंतचे हक्क विकत घेतले आहेत. यामुळे २०२८ पर्यंतच्या आयपीएल स्पर्धांना टाटा आयपीएल याच नावाने ओळखले जाणार आहे. टाटा समुहाने प्रत्येक वर्षीच्या स्पर्धेसाठी ५०० कोटी याप्रमाणेच २०२४, २०२५, २०२६, २०२७, २०२८ या पाच आयपीएलसाठी २५०० कोटी रुपये मोजले.

आयपीएल टायटल स्पॉन्सरर

२००८ ते २०१२ – डीएलएफ – प्रत्येक वर्षासाठी ४० कोटी रुपये
२०१३ ते २०१५ – पेप्सी – प्रत्येक वर्षासाठी ७९.२ कोटी रुपये
२०१६ ते २०१७ – विवो – प्रत्येक वर्षासाठी १०० कोटी रुपये
२०१८ ते २०१९ – विवो – प्रत्येक वर्षासाठी ४४० कोटी रुपये
२०२० – ड्रीम११ – एका वर्षासाठी २२२ कोटी रुपये
२०२१ – विवो – एका वर्षासाठी ४४० कोटी रुपये
२०२२ ते २०२३ – टाटा – प्रत्येक वर्षासाठी ३३५ कोटी रुपये
२०२४ ते २०२८ – टाटा – प्रत्येक वर्षासाठी ५०० कोटी रुपये

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version