बंगळुरू, १७ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या वीस षटकांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना बंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियम येथे होणार आहे. सामन्याचे टीव्हीवरील थेट प्रक्षेपण भारतीय वेळेनुसार बुधवारी १७ जानेवारी रोजी संध्याकाळी सात वाजल्यापासून सुरू होणार आहे. ही मालिका भारताने आधीच जिंकली आहे. यामुळे तिसरा सामना जिंकून भारत अफगाणिस्तानला ‘व्हाईटवॉश’ देणार की नाही, याकडे अनेक क्रिकेटप्रेमींचे लक्ष आहे.
इंदूर टी २० (दुसरा सामना) : भारताचा सहा गडी राखून विजय
नाणेफेक जिंकून भारताचा गोलंदाजीचा निर्णय
अफगाणिस्तान : २० षटकांत सर्वबाद १७२ धावा
भारत : १५.४ षटकांत चार बाद १७३ धावा
मोहाली टी २० (पहिला सामना) : भारताचा सहा गडी राखून विजय
नाणेफेक जिंकून भारताचा गोलंदाजीचा निर्णय
अफगाणिस्तान : २० षटकांत पाच बाद १५८ धावा
भारत : १७.३ षटकांत चार बाद १५९ धावा
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.