पंढरपूर, ०८ जानेवारी २०२४, प्रतिनिधी: सोलापुरातील अत्यंत प्रसिद्ध अशाभीमा केसरी कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख ने पंजाब केसरी प्रदीपसिंगला आसमान दाखवले. पंजाब केसरी विजेता भुपेंद्र अजनालायास पराभूत करत सिकंदरने सोलापूर आणि महाराष्ट्राचा मान राखला. खासदार धनंजय महाडिकांच्या वाढदिवसानिमित्त मोहोळमध्ये या कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.
भीमा केसरी कुस्ती स्पर्धेतशेवटच्या पाच कुस्त्या अत्यंत महत्वपूर्ण आणि चुरशीच्या ठरल्या, हजारो कुस्ती प्रेमींची गर्दी दिसली. यावेळी भीमा केसरीचा किताब पटकावलेल्या सिकंदर शेख ने मानाची गधा हातात घेत केसरीचे आयोजक खासदार धनंजय महाडिक यांना खांद्यावर घेत लाल मातीच्या आखाड्यात जल्लोष करत आनंद व्यक्त केला.
महत्त्वाचे मुद्दे –
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.