आयपीएलसाठी परदेशात खेळाडूंचा लिलाव

आयपीएलसाठी परदेशात खेळाडूंचा लिलाव

नवी दिल्ली, १२ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ अर्थात आयपीएल २०२४ साठी यंदा परदेशात खेळाडूंचा लिलाव होणार आहे. दुबईत मंगळवार १९ डिसेंबर २०२३ रोजी हा लिलाव होईल. भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजता लिलाव सुरू होईल. यंदा ३३३ खेळाडूंचा लिलाव केला जाईल. लिलावात सहभागी होणार असलेल्यांपैकी २१४ क्रिकेटपटू भारतीय तर ११९ जण परदेशी खेळाडू आहेत. सर्व संघांकडे मिळून ७७ स्लॉट उपलब्ध आहेत. यापैकी ३० स्लॉटसाठी परदेशी खेळाडूंचा विचार होऊ शकेल.

गुजरात टायटन्सकडे सर्वाधिक ३८.१५ कोटी रुपये आहेत. सर्वाधिक १२ स्लॉट कोलकाता नाईटरायडर्सकडे आहेत. यंदाच्या लिलावासाठी २३ क्रिकेटपटूंचा २ कोटी किमान किंमत अर्थात दोन कोटींची बेस्ड प्राईज असलेल्यांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version