करणी सेनेच्या प्रदेशाध्यक्षाची हत्या

करणी सेनेच्या प्रदेशाध्यक्षाची हत्या

जयपूर, ५ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची मंगळवारी हत्या करण्यात आली. सुखदेव सिंग यांच्यावर त्यांच्या श्यामनगर येथील घराबाहेर गोळ्या झाडण्यात आल्या. स्कूटरवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केला आणि पळून गेले. अतिशय जवळून गोळ्या झाडण्यात आल्या. सुखदेव सिंग यांना दोन गोळ्या लागल्या. जखमी झालेल्या सुखदेव सिंग यांना मानसरोवर स्थित मेट्रो मास रुग्णालयात नेण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

सुखदेव यांच्यावर गोळीबार झाला त्यावेळी त्यांच्यासोबत अजित सिंह पण होते. ते जखमी झाले आहेत. अजित सिंह यांच्यावर उपचार सुरू आहेत. गोळीबाराची माहिती मिळताच पोलिसांनी परिसरात नाकाबंदी केली आणि मारेकऱ्यांचा शोध सुरू केला आहे. परिसरातल्या सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फूटेज तपासण्याचे काम सुरू आहे. मारेकऱ्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version