बंगळुरू, ४ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू वेडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने २० षटकांत आठ विकेट गमावत १६० धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाला २० षटकांत आठ गडी गमावून केवळ १५४ धावा करता आल्या. या सामन्यातील सामनावीर हा अक्षर पटेल ठरला. अक्षरने २१ चेंडूत ३१ धावा करत ४ षटकांत १४ धावा देत ऑस्ट्रेलियाचा १ बळी घेतला. भारताने ही मालिका ४-१ अश्या पद्धतीने जिंकली आहे. तर या मालिकेचा मालिकावीर रवी बिश्नोई ठरला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.