क्रिकेटमध्ये आला नवा नियम

क्रिकेटमध्ये आला नवा नियम

नवी दिल्ली, २१ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : आयसीसीने टी – २० आणि एकदिवसीय क्रिकेटसाठी एक नवा नियम लागू केला आहे. सध्या हा नियम फक्त पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टी – २० आणि एकदिवसीय सामन्यांसाठी आहे. या नियमानुसार गोलंदाजी करणाऱ्या संघाला दोन षटकांत ६० सेकंदांपेक्षा कमी कालावधीचे अंतर ठेवण्याचे बंधन असेल. दोन षटकांत ६० सेकंदांपेक्षा जास्त कालावधी वाया गेला तर त्याची नोंद केली जाईल. ही चूक तीन वेळा केली तर गोलंदाजी करणाऱ्या संघाला थेट पाच धावांचा दंड केला जाईल. भारत – ऑस्ट्रेलिया यांच्यात २३ नोव्हेंबरपासून टी – २० मालिका सुरू होत आहे. या पाच सामन्यांच्या मालिकेपासून नवा नियम लागू होणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version