अहमदाबाद, १९ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने ५० षटकांत सर्वबाद २४० धावा केल्या. विजयासाठी ऑस्ट्रेलियाला ५० षटकांत २४१ धावा करण्याचे आव्हान भारताने दिले. चांगली सुरुवात करणाऱ्या भारताचे फलंदाज ठराविक अंतराने बाद होत राहिले. यामुळे धावांचा वेग मंदावला. भारताकडून केएल राहुलने सर्वाधिक ६६ धावा केल्या. विराट कोहलीने ५४ तर कर्णधार रोहित शर्माने ४७ धावा केल्या.
गोलंदाजांवर मदार
यंदाच्या विश्वचषकात सलग दहा विजय मिळवणाऱ्या भारताला अंतिम सामन्यात मोठी धावसंख्या उभारणे जमले नाही. ही प्रथम फलंदाजी करतानाची यंदाच्या विश्वचषकातील भारताची सर्वात कमी धावसंख्या आहे. यामुळे विजयासाठी भारताची मदार गोलंदाजांवर आहे.
असे बाद झाले भारताचे फलंदाज
१. शुभमन गिल सात चेंडूत चार धावा करून स्टार्कच्या चेंडूवर झम्पाकडे झेल देऊन परतला
२. रोहित शर्मा एकतीस चेंडूत सत्तेचाळीस धावा करून मॅक्सवेलच्या चेंडूवर हेडकडे झेल देऊन परतला (३ षटकार, ४ चौकार)
३. श्रेयस अय्यर तीन चेंडूत चार धावा करून पॅट कमिन्सच्या चेंडूवर जोश इंग्लिसकडे झेल देऊन परतला (१ चौकार)
४. विराट कोहली ६३ चेंडूत ५४ धावा करून पॅट कमिन्सच्या चेंडूवर त्रिफळाचीत (४ चौकार)
५. रवींद्र जडेजा २२ चेंडूत ९ धावा करून हेझलवूडच्या चेंडूवर जोश इंग्लिसकडे झेल देऊन परतला
६. केएल राहुल १०७ चेंडूत ६६ धावा करून स्टार्कच्या चेंडूवर जोश इंग्लिसकडे झेल देऊन परतला (१ चौकार)
७. मोहम्मद शमी १० चेंडूत ६ धावा करून स्टार्कच्या चेंडूवर जोश इंग्लिसकडे झेल देऊन परतला (१ चौकार)
८. जसप्रीत बुमराह २ चेंडूत १ धाव करून झम्पाच्या चेंडूवर पायचीत
९. सूर्यकुमार यादव २८ चेंडूत १८ धावा करून हेझलवूडच्या चेंडूवर जोश इंग्लिसकडे झेल देऊन परतला (१ चौकार)
१०. कुलदीप यादव १८ चेंडूत १० धावा करून धावचीत
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.