‘क्रिकेट सामन्यांनंतर मुंबई-दिल्लीत आतिषबाजी नाही’

‘क्रिकेट सामन्यांनंतर मुंबई-दिल्लीत आतिषबाजी नाही’

मुंबई, १ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर गुरुवारी भारताचा सामना श्रीलंकेशी होणार आहे. मात्र, या सामन्यादरम्यान आणि नंतर स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांना फटाक्यांच्या आतिषबाजीचा आनंद घेता येणार नाही. मुंबईतच नाही तर दिल्लीतही होणाऱ्या सामन्यातही हाच उपक्रम राबवला जाणार आहे. दोन्ही शहरांमधील खराब हवेच्या गुणवत्तेच्या निर्देशांकामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे. विश्वचषकाचा पुढील सामना ६ नोव्हेंबर रोजी बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात दिल्लीत होणार आहे. तेथेही प्रेक्षकांना आतिषबाजी अनुभवता येणार नाही.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version