रविवारी जिंकल्यास भारताला होईल मोठा फायदा

रविवारी जिंकल्यास भारताला होईल मोठा फायदा

धरमशाला, २१ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत रविवारी भारत आणि न्यूझीलंड आमनेसामने असतील. धरमशाला येथे असलेल्या या सामन्यात जिंकल्यास भारताचा उपांत्य फेरीचा प्रवेश टप्प्यात येणार आहे. भारत २००३ पासून विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड विरुद्धचा सामना जिंकलेला नाही. यामुळे रविवारी काय होणार याची उत्सुकता क्रिकेटप्रेमींना आहे. रविवारच्या सामन्यानंतर न्यूझीलंडला ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्या विरोधात तर भारताला नेदरलँड, श्रीलंका, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्या विरोधात खेळायचे आहे.

भारतात होत असलेल्या यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत प्रत्येक संघाला राउंड रॉबिन स्वरूपात नऊ साखळी सामने खेळावे लागतील. गुणतालिकेतील अव्वल चार संघांना उपांत्य फेरीत प्रवेश मिळेल. भारताचे आतापर्यंत चार साखळी सामने झाले आहेत. हे सर्व सामने भारताने जिंकले आहेत. भारताने ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्याविरुद्धचे सामने जिंकले आहेत. न्यूझीलंडनेही विश्वचषकातील चार साखळी सामने जिंकले आहेत. यामुळे दोन्ही संघ आपली विजयी घोडदौड सुरू ठेवण्यासाठी रविवारी मैदानात उतरणार आहेत. रविवारी भारत – न्यूझीलंड सामना जिंकणाऱ्या संघाला नंतर फक्त एक विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश करता येईल. यामुळे रविवारच्या सामन्याचे महत्त्व वाढले आहे.

२२ ऑक्टोबर २०२३, रविवार : भारत विरुद्ध न्यूझीलंड
२९ ऑक्टोबर २०२३, रविवार : भारत विरुद्ध इंग्लंड
२ नोव्हेंबर २०२३, गुरुवार : भारत विरुद्ध श्रीलंका
५ नोव्हेंबर २०२३, रविवार : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
१२ नोव्हेंबर २०२३, रविवार : भारत विरुद्ध नेदरलँड

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version