लॉस अँजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश

लॉस अँजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश

लॉस अँजेलिस, १६ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : अमेरिकेतील लॉस अँजेलिस येथे २०२८ मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन होणार आहे. या ऑलिम्पिकमध्ये पाच खेळांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. लॉस अँजेलिस ऑलिम्पिकमध्ये ज्या खेळांचा समावेश केला आहे त्यात क्रिकेट आहे. यामुळे भारतीय उपखंडातील ऑलिम्पिकच्या प्रेक्षकांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. क्रिकेट, बेसबॉल – सॉफ्टबॉल, लॅक्रॉस, स्क्वॉश, फ्लॅग फुटबॉल या खेळांचा लॉस अँजेलिस ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यात आला आहे.

लॉस अँजेलिस ऑलिम्पिक २०२८ मध्ये होणार
लॉस अँजेलिस ऑलिम्पिकमध्ये ५ खेळांचा समावेश
क्रिकेट, बेसबॉल – सॉफ्टबॉल, लॅक्रॉस, स्क्वॉश, फ्लॅग फुटबॉल

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version