भारत-पाकिस्तान सामना, पहा दोन्ही संघांची प्लेईंग ११…

भारत-पाकिस्तान सामना, पहा दोन्ही संघांची प्लेईंग ११…

अहमदाबाद, १४ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ सुरु झाल्यापासून क्रिकेट प्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान ज्या सामन्याची प्रत्येक क्रिकेटप्रेमी आवर्जून वाट पाहत असतो तो म्हणजे भारत – पाकिस्तान सामना आज खेळला जाणार आहे.

आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या १२ व्या सामन्यात सर्वात मोठा क्रिकेट सामना पाहायला मिळणार आहे. भारताचा आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पाकिस्तान विरुद्ध सामना आहे. या दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन सामने जिंकल्यामुळे स्पर्धेची चांगली सुरुवात केली. भारताने अफगाणिस्तानविरुद्धचा त्यांचा शेवटचा सामना आठ गडी राखून जिंकला, तर पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्धचा शेवटचा सामना सहा गडी राखून जिंकला. हा सामना जिंकून ७-० असा विश्वचषकातील शाप मोडून काढण्यासाठी पाकिस्तान सर्वतोपरी प्रयत्न करेल, मात्र या चुरशीच्या सामन्यात भारत आपले वर्चस्व कशाप्रकारे दाखवणार याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत.

भारतीय संघाची संभाव्य प्लेईंग ११:

रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन/शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

पाकिस्तान संघाची संभाव्य प्लेईंग ११:

बाबर आजम (कर्णधार), मोहम्मद शकील, इमाम उल हक, मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), सऊद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन अफ्रिदी, हारिस रौफ.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version