विजय एक, विक्रम अनेक

विजय एक, विक्रम अनेक

दिल्ली, १२ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताने अफगाणिस्तान विरुद्धचा सामना आठ गडी राखून जिंकला. या सामन्यात अफगाणिस्तानने पन्नास षटकांत आठ बाद २७२ धावा केल्या. धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताने ३५ षटकांत दोन बाद २७३ धावा करत सामना जिंकला. ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांविरुद्ध विजय मिळवल्यामुळे भारताने विश्वचषकात दोन सामन्यांनंतर चार गुणांसह गुण तालिकेत दुसरा क्रमांक पटकावला आहे. भारताची सरासरी धावगती +१.५०० आहे. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने ८४ चेंडूत १३१ धावा केल्या. ही कामगिरी करताना रोहितने सोळा चौकार आणि पाच षटकार मारले. या कामगिरीची दखल घेत त्याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. भारताने अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात विजय मिळवताना अनेक विक्रम रचले.

भारताचा कर्णधार रोहित शर्माने ६३ चेंडूत विश्वचषकातील त्याचे सातवे शतक पूर्ण केले

भारताने विश्वचषकात यशस्वी पाठलाग केलेल्या मोठ्या धावसंख्या

२८८ विरुद्ध झिम्बाब्वे, ऑकलंड, २०१५
२७५ विरुद्ध श्रीलंका, मुंबई, अंतिम सामना, २०११
२७४ विरुद्ध पाकिस्तान, सेंच्युरियन, २००३
२७३ विरुद्ध अफगाणिस्तान, दिल्ली, २०२३
२६५ विरुद्ध श्रीलंका, हेडिंग्ले, २०१९

दिल्लीतल्या एकदिवसीय सामन्यात मोठ्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग

२७८ – भारत विरुद्ध श्रीलंका, १९८२
२७३ – भारत विरुद्ध अफगाणिस्तान, २०२३
२७२ – श्रीलंका विरुद्ध भारत, १९९६
२३९ – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, १९८६
२३८ – भारत विरुद्ध इंग्लंड, २०११

विश्वचषकात २५० पेक्षा जास्त धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करताना सर्वाधिक धावगती

७.८ – (२७३/२) – भारत विरुद्ध अफगाणिस्तान, दिल्ली, २०२३
७.७८ – (२८३/१) – न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड, अहमदाबाद, २०२३
७.७५ – (३२२/३) – बांगलादेश विरुद्ध वेस्ट इंडिज, टाँटन, २०१९
७.१३ – (३४५/४) – पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका, हैदराबाद, २०२३
७.०५ – (२६०/२) – भारत विरुद्ध आयर्लंड, हॅमिल्टन, २०१५

भारतासाठी पहिल्या पॉवरप्लेमधील सर्वोच्च धावसंख्या

९७/२ विरुद्ध श्रीलंका, होबार्ट, २०१२
९४/० विरुद्ध अफगाणिस्तान, दिल्ली, २०२३
९१/१ विरुद्ध श्रीलंका, कोलंबो, २०२१
८७/० विरुद्ध दक्षिण आफ्रिका, नागपूर, २०११
८३/१ विरुद्ध वेस्ट इंडिज, पोर्ट ऑफ स्पेन, २०१९

विश्वचषकात सातव्यांदा २५० पेक्षा जास्त धावांचा यशस्वी पाठलाग

भारताने विश्वचषकात सातव्यांदा २५० पेक्षा जास्त धावांचा यशस्वी पाठलाग केला. इतर कोणत्याही संघाला इतक्यांदा ही कामगिरी करणे जमलेले नाही. कर्णधार रोहित शर्माने विश्वचषकात सात शतके केली. याआधी सचिन तेंडुलकरने विश्वचषकात सहा शतके केली होती.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version