आशिया चषकात भारताचा पाकिस्तानवर दमदार विजय

आशिया चषकात भारताचा पाकिस्तानवर दमदार विजय

मुंबई, ३ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आशिया चषकात रंगतदार सामना सुरु होता. पण तिकडे हॉकीच्या मैदानात भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवला. हॉकी ५ एस आशिया चषकात भारताने पाकिस्तानवर ६-४ असा विजय मिळवला आहे. मनिंदर ,मोहम्मद रहील,पवन राजभर आणि गुरजोत सिंह यांनी आपल्या सर्वोच्च खेळाचं प्रदर्शन केले.

हॉकीच्या मैदानात भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये दमदार लढत पाहायला मिळाली. पाकिस्तानचा संघ एकवेळ ३-२ असा आघाडीवर होता. पण भारतीय खेळाडूंनी अखेरच्या काही मिनिटांमध्ये आपला खेळ उंचावला. दोन सत्राचा खेळ संपला तेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना ४-४ असा बरोबरीत सुटला होता. सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआऊटमध्ये लागला. पहिल्या हाफमध्ये पाकिस्तानच्या संघाने सामन्यावर वर्चस्व मिळवले होते. पण भारताने दमदार कमबॅक केले.

पेनल्टी शूटआऊटमध्ये भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी करत ६-४ असा विजय मिळवला. या विजयासह भारताने आशिया चषक ५ एस चषकावर नाव कोरले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version