समृद्धी महामार्गावरील पूल कोसळला

समृद्धी महामार्गावरील पूल कोसळला

नाशिकच्या इगतपुरीमध्ये समृद्धी महामार्गावरील निर्माणाधीन पूल कोसळल्याची घटना घडली आहे. इगतपुरी तालुक्यातील बेलगाव तरहाळे ते गांगडवाडी दरम्यान हा पूल कोसळला आहे.

नाशिकच्या इगतपुरीमध्ये समृद्धी महामार्गावरील निर्माणाधीन पूल कोसळला आहे. इगतपुरी तालुक्यातील बेलगाव तरहाळे ते गांगडवाडी दरम्यानचा हा पूल कोसळला आहे. पुलाचं काम सुरू असताना अचानक कोसळ्याची घटना घडली. या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर पुलाच्या कामाचं ऑडिट करण्याची स्थानिक ग्रामस्थांनी मागणी केली आहे. तसेच या पूलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचे नागरिकांकडून म्हटलं जात आहे .

समृद्धी महामार्ग सर्वाधिक अपघातासाठी चर्चेचा विषय ठरत असतो. या समृद्धी महामार्गावरील अपघातात आतापर्यंत शेकडो लोकांचा बळी गेला आहे. समृद्धी महामार्गावरील सिन्नर ते इगतपुरी दरम्यानचा टप्पा महत्वाचा मानला जातो.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version