हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसापासून हळूहळू बोचऱ्या थंडीचा गारठा वाढतो आहे. मात्र फुटपाथ आणि रस्त्यावर झोपणाऱ्या गोरगरिबांना थंडी आणि कोरोना या दोन्ही अडचणींचा सामना करावा लागतो आहे. समाजापासून दूर असलेल्या अशा वंचितांना हिंगोली करांनी मायेची उब दिली आहे. हिंगोली जिल्ह्यात ‘नको असेल ते द्या, हवे असेल ते घेऊन जा’ असा हा उपक्रम राबविला जात आहे.
उपक्रमासाठी हिंगोलीच्या योग विद्या धामने पुढाकार घेतला आहे. मागील चार दिवसांपासून हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमामुळे अनेक निराधारांना, गरजवंतांना आधार मिळू लागला आहे. शहरातील स्टेट बँक ऑफ हैदराबाद परिसरात ही माणुसकीची भिंत उभारण्यात आली आहे.
सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत इथे मदत दिली जाणार आहे. चांगले पण वापरात नसलेले कपडे आणून देण्याचे आवाहन, योग विद्याधामच्या वतीने करण्यात आले आहे. या उपक्रमाबद्दल यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. माणुसकीच्या भिंतीचा एन थंडीच्या दिवसात अनेक गरजवंतांना फायदा होणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.