‘मार्च महिन्यात कोरोनाची तिसरी लाट संपणार’ – राजेश टोपे

‘मार्च महिन्यात कोरोनाची तिसरी लाट संपणार’ – राजेश टोपे

राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. तर विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येत आहे. याच पार्श्वभूमीवर मार्च माहिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट संपेल, असे वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात केले आहे.

जालन्यातील एका कार्यक्रमात आरोग्यमंत्री राजेश टापे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी राजेश टोपे म्हणाले, मागील दोन दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. दिवसाला राज्यात ४८ हजार रुग्ण सापडत होते. मात्र, आता रुग्णसंख्या दैनंदिन १० ते १५ हजारांवर आली आहे, असे राजेश टोपे म्हणाले.

राजेश टोपे म्हणाले, राज्यात ज्या ठिकाणी कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात आढळत होते, तेथेही कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. मुंबईमध्ये रुग्णसंख्या ५००वर आली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांचा आलेख कमी झालेला दिसत आहे. त्यामुळे मार्च महिन्यात कोरोनाची तिसरी लाट संपणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्यामुळे निर्बंध शिथिल करण्याचा कल राज्य सरकारचा आहे. राज्यात काही ठिकाणी निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. तर यापुढेही राज्यातील निर्बंध कमी करण्यात येणार असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version