‘लस न घेणाऱ्यांच्या सुविधा रोखा’ – हसन मुश्रीफ

‘लस न घेणाऱ्यांच्या सुविधा रोखा’ – हसन मुश्रीफ

अहमदनगरमध्ये कोरोनाच्या दोन्ही लसी न घेतलेल्या नागरिकांच्या सर्व सोयी-सुविधा बंद करण्याचे आदेश अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रशासनाला दिले आहेत. देशात ओमायक्रॉन विषाणूने शिरकाव केला असून राज्यात ओमायक्रॉन व्हेरिएंटचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे खबरदारी घेत सर्व नागरिकांनी कोरोना लसी घेण्याचे आवाहन मुश्रीफांनी केले आहे. तसेच कोरोनाच्या दोन्ही लस न घेणाऱ्या नागरिकांच्या सर्व सुविधा बंद करणार असल्याचा आदेश हसन मुश्रीफांनी दिला आहे.

अहमदनगरमधील दोन्ही लसींचे डोस न घेणाऱ्या नागरिकांच्या सर्व सोयी-सुविधा बंद करण्यात येणार असून लस न घेणाऱ्या नागरिकांना पेट्रोल पंपवर पेट्रोल देण्यासही बंदी घालण्याचे आदेश अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रशासनाला दिले आहेत. तसेच गावागावांमध्ये लस न घेणाऱ्या नागरिकांची नावे जाहीर करण्याचे आदेशही मुश्रीफांनी दिले आहेत.

अहमदनगर जिल्ह्यात अद्यापही नऊ लाख नागरिकांनी कोरोनाची पहिली लस घेतलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांचे कोरोना लसीकरण पूर्ण होण्यासाठी प्रशासनाकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.

कोरोना परिस्थिती काही प्रमाणात स्थिरावत असताना आता कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने डोकं वर काढले आहे. दिवसेंदिवस देशात ओमायक्रॉन विषाणूचे रुग्ण आढळत असून सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. तर दुसरीकडे अहमदनगर जिल्ह्यात अद्याप नागरिकांचा लसीकरणाचा पहिला डोस झालेला नाही, त्यामुळे नागरिकांचे लसीकरण पूर्ण होण्यासाठी लस न घेणाऱ्या नागिरिकांच्या सर्व सोयीसुविधा बंद करण्याचे आदेश पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रशासनाला दिले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version