Ashadhi Yatra 2026 : विठ्ठल पावला! यंदाच्या आषाढी यात्रेला मंदिरास 8 कोटींचं दान; भाविकांच्या सुविधांसाठी उत्पन्न वापरण्याचा व्यवस्थापनाचा मानस

Ashadhi Yatra 2026 : विठ्ठल पावला! यंदाच्या आषाढी यात्रेला मंदिरास 8 कोटींचं दान; भाविकांच्या सुविधांसाठी उत्पन्न वापरण्याचा व्यवस्थापनाचा मानस

पंढरपूर : आषाढी यात्रा कालावधीत वारकरी भाविकांनी श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेच्या चरणी 8 कोटी 92 लाख रुपयांचे दान केले. तसेच सोने-चांदीचे दागिने अर्पण केले असून मंदिर समितीला लाडू प्रसाद, देणगी, भक्तनिवास, हुंडीपेटी, श्रींच्या चरणाजवळ आदी विविध देणग्यांच्या माध्यमातून उत्पन्न मिळाल्याची माहिती मंदिरे समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

यंदा आषाढी यात्रा कालावधीत दर्शनरांगेत भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. भाविकांचे सुलभ जलद दर्शन होण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना देखील मंदिर समितीने केल्या होत्या. आषाढ शुद्ध 01 (15 जुलै) ते आषाढ शुद्ध 15 (29 जुलै) या कालावधीत भाविकांनी श्रींच्या चरणाजवळ 71,44,078 रुपये अर्पण, 2,93,97,076 रुपये देणगी, 83,47,000 रुपये लाडू प्रसाद विक्री, 46,31,103 रुपये भक्तनिवास, 2,40,32,402 रुपये हुंडीपेटी, 15,27,443 रूपये परिवार देवता तसेच 96,72,937 रुपये सोने-चांदी अर्पण, तसेच अगरबत्ती, चंदन खोड, चंदन पावडर, महावस्त्रे, फोटो, मोबाईल लॉकर आदी माध्यमातून 45,20,439  इतके उत्पन्न प्राप्त झाले आहे. 

हेही वाचा : Shivsena Symbol Case : शिवसेना पक्ष आणि चिन्हप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार; न्यायाधीशांनी मुद्द्यांबाबत दिले हे आदेश

मागील वर्षी श्रींच्या चरणाजवळ 75,05,291 रुपये अर्पण, 2,88,33,569 रुपये देणगी, 94,04,340 रुपये लाडू प्रसाद विक्री, 45,41,458 रुपये भक्तनिवास, 1,44,71,348 रुपये हुंडीपेटी, 32,45,682 रूपये परिवार देवता तसेच 3,59,61,768 रुपये सोने-चांदी अर्पण, तसेच अगरबत्ती, चंदन खोड, चंदन पावडर, महावस्त्रे, फोटो, मोबाईल लॉकर आदी माध्यमातून 12,45,075 रुपये व 3 इलेक्ट्रिक रिक्षा/बसचे 32 लक्ष इतके उत्पन्न प्राप्त झाले होते.

2025 च्या आषाढी यात्रेत 10,84,08,531 रुपये तर या वर्षीच्या यात्रेत 8,92,72,478 रुपये इतके उत्पन्न प्राप्त असून, मागील यात्रेच्या तुलनेत 1,91,36,053 रुपये इतकी घट झाल्याचे दिसून येत आहे. या दानातून श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी भाविकांना पुरेशा प्रमाणात सोई-सुविधा उपलब्ध करून देण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न राहील, असे व्यवस्थापक प्रविणकुमार घम यांनी सांगितले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version